घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान नाही; सत्तार, केसरकर, सावंत यांचा पत्ता कट

घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान नाही; सत्तार, केसरकर, सावंत यांचा पत्ता कट

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची नावे नाहीत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे. घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान दिले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 12 डिसेंबर रोजी दिल्लीत मंत्रि‍पदाची यादी फायनल झाल्याचे सांगीतले जाते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळाले यापेक्षा कोणाला डच्चू मिळाला, याची चर्चा राजकीय वर्तिळात रंगत आहे. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या मंत्रिमंडळाच्या यादीत नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी शुक्रवारी सावंत आणि केसरकर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री त्यांना शिंदे यांनी भेट दिली. तेव्हाच त्यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट झाले होते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची...
पाळधी हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक, सकाळी सहा वाजता कर्फ्यू हटवला जाईल; पोलिसांची माहिती
दोषी नव्हता मग वाल्मीक कराड फरार का होता? आमदार संदीप क्षीरसागर याचा सवाल
देवगड तालुक्यात नववर्षाचा जल्लोष, विजयदूर्ग किल्ल्यावर रंगणार दिपोत्सवाचा सोहळा
नववर्षात मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका, 17800 जणांवर कारवाई; दंडामुळे सरकारी तिजोरीत भर
दापोलीत नव वर्षाच्या स्वागतासाठी तिखटाचा बेत; मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी
शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले