मालिका संपल्यानंतर भेटले ‘आई कुठे काय करते’चे कलाकार; कौमुदीच्या केळवणाचे फोटो चर्चेत
मालिका संपल्यानंतर भेटले ‘आई कुठे काय करते’चे कलाकार; कौमुदीच्या केळवणाचे फोटो चर्चेत
अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट
कौमुदीचे केळवण ……
जी मुलगी कायम इतर लोकांना असे सरप्राइज देते तिच्यासाठी प्लॅन करायचे म्हणजे आम्हा सगळ्यांना फार जपून पाऊल टाकावी लागली. म्हणून कुडाळला जावून हे केळवण करण्याचा प्लॅन @archanapatkar10 म्हणजे आमच्या आज्जीचा. अर्थात काही कारणास्तव आजी ल शक्य झाले नाही पण ती आमच्यात होतीच. Location बदलले तरी फील तसाच होता.
आम्हा 4 जणांसाठी हे खरे तर घरातलेच लग्नं आहे. त्यामुळे लगीनघाई अगदी फक्त पुण्यामध्ये सुरू आहे असे नाही. तर ती पसरणीमध्ये ही सुरू आहे. कौमुदीसाठी करतोय तर तिला काय आवडते यापासून तिला झेंडू नाही आवडत पण मला आवडतो म्हणून तिला चालेल इथपर्यंतचा हा माझा प्रवास होता. कारण तिला माणूस आवडला की ती त्यासाठी काहीही करायला तयार असते.
प्रवासात माणूस उमगतो तसे आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आमच्या खास मैत्रिणीचे लग्नं म्हणजे आनंद आहे आणि ती आता किती सोबत असेल म्हणून मनात धाकधूक सुद्धा आहेच. पण आमचे दाजीसाहेब @aakash_chowkase यांना भेटून चिंता मिटली.
कौमुदीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचे सगळे प्लॅनिंग कमाल झाले याने आम्हाला हायसे वाटले.
तिला निसर्ग आवडतो म्हणून जागाही तशीच होती. त्याचे प्लॅन @bhagyashalianup ने केले.
एकंदरीत या केलवणामुळे अनेकांना आनंद झाला ती सगळी माझी मंडळी त्यांचे आभार आभार ….
@brownstoneresort चे मालक आणि माझा मित्र मिलिंद शिंदे चे आभार. माझी मम्मीचे @vidyapradipkumarmahangade सुद्धा आभार कारण यात गोष्टींची जमवाजमव तिने फार छान केली. @madhuri_vivi , @pranav__gujar यांचे तर खूप आभार कारण मज्जा त्यांच्यामुळे आली. त्यामुळे हे केळवण आम्ही 4 जणांनी प्लॅन केले असते तर या मंडळींमुळे जास्त सोप्पे झाले सगळे. आमची कौमुदी कायम आनंदी राहावी आणि पुढील आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा..
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List