महायुतीत भांडणं व्हायचीच बाकी, मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरे संतापले

महायुतीत भांडणं व्हायचीच बाकी, मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरे संतापले

23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अद्याप मंत्रिमंडळ जाहीर न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपचे नेते कुठल्याही थराला जाऊ शकतात, महायुतीत मंत्रिपदावरून भांडणसुद्धा होईल असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने स्पष्ट बहुमत देऊनसुद्धा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी 10 दिवस लागले. आता कुणाला किती मंत्रिपदं मिळतील यासाठी ते वेळ लावत आहेत. मंत्रिपदावरून त्यांच्यांत भांडणसुद्धा होईल. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपचे नेते कुठल्याही थराला जाऊ शकतात, लोकांची कामं खोळंबली आहेत जनता वाट बघू शकते पण आधी या राजकारण्यांची सत्तेची भुक मिटणे गरजेचे आहे. ही शरमेची बाब आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती
भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख...
अर्जून कपूर म्हणाला मी सिंगल, त्यावर मलायकानं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली…
रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात
देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली