UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, NPCI ने नवीन वर्षात UPI मध्ये केले महत्त्वाचे बदल, वाचा सविस्तर…
NPCI ने UPI सुविधा युजर्सची सोय लक्षात घेऊन यावर्षी 2024 मध्ये UPI मध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. UPI सर्कल नावाचे एक नवीन फीचर सादर करण्यात आले आहे. तसेच वॉलेट मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.
हिंदुस्थानात गेल्या काही काळापासून ऑनलाइन UPI सुविधांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. NPCI ने दिलेल्या आकडेवारी नुसार नोव्हेंबरमध्ये जवळजवळ 15,482 मिलीयनचा व्यवहार करण्यात आला आहे. ही आकडेवारी लक्षात घेवून NPCI ने नववर्षात UPI सुविधेत मोठे बदल करण्यात आले आहे. NPCI विशिष्ट श्रेणींमध्ये व्यवहारांसाठी UPI मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये हॉस्पिटल किंवा शिक्षण संस्थानांची फि भरण्याचे व्यवहार तसेच आईपीओ अप्लाय आहेत.
तसेच NPCI ने UPI सर्कल नावाने नवीन फिचर लॉन्च केले आहे. या फिचर्सच्या मदतीने जर कोणाकडे UPI बॅंक लिंक नसेल तरिहि UPI साहाय्याने व्यवहार करू शकतो. यामध्ये दुय्यम वापरकर्ता UPI द्वारे पेमेंट करतो तेव्हा त्याचे नोटीफिकेशन वापरकर्त्याला येईल. त्यामुळे वापरकर्त्याच्या मंजुरीनंतरच पेमेंट केले जाऊ शकते. यामध्ये ज्या युजरकडे UPI आयडी असेल त्यामुळे आणि UPI सर्कलशी लिंक केलेल्या युजरला दुय्यम वापरकर्ता म्हटले जाईल. यामध्ये तुम्ही 15,000 रुपयांपर्यंत मर्यादा सेट करू शकता. याचा अर्थ UPI सर्कलशी जोडलेले वापरकर्ते या काळात या रकमेपर्यंत पेमेंट करू शकतील. यामध्ये, प्रत्येक वेळी पेमेंट करण्यासाठी दुय्यम वापरकर्त्यास मुळ वापरकर्त्याची परवानगी आवश्यक असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List