लग्नाच्या 6 महिन्यांतच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? चर्चांवर अखेर सोडलं मौन

लग्नाच्या 6 महिन्यांतच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? चर्चांवर अखेर सोडलं मौन

जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षी जून महिन्यात मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी नोंदणी पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि झहीर यांना एका क्लिनिकबाहेर एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये ‘गुड न्यूज’ची चर्चा होऊ लागली होती. लग्नाच्या सहा महिन्यांतच सोनाक्षी गरोदर राहिली की काय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. त्यानंतर लगेचच सोनाक्षी आणि झहीरने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. सोनाक्षीने दिलेल्या या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीला विचारण्यात आलं की लग्नानंतर तिला आणि तिच्या पतीला सतत कुठे ना कुठे डिनर आणि लंचला बोलावलं जातंय का? त्यावर उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, “होय आणि मी इथे स्पष्ट करू इच्छिते की मी प्रेग्नंट नाही. मी फक्त जाड झाली आहे. त्यादिवशी एका व्यक्तीने झहीरला शुभेच्छा दिल्या. त्यावर आम्हाला समजलं की काहीतरी गडबड आहे. आम्ही आमचं लग्न एंजॉय करू शकत नाही का?” हे ऐकल्यानंतर सोनाक्षीच्या बाजूलाच बसलेला झहीर मस्करीत म्हणतो, “.. आणि दुसऱ्या दिवसापासूनच तिचं डाएट सुरू झालं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी पुढे म्हणते, “आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले आहेत आणि प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आम्ही दोघं प्रवासातच खूप व्यस्त आहोत. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतोय आणि सतत कोणत्या ना कोणत्या लंच किंवा डिनरला जातोय.” इन्स्टाग्रामवरील फोटोबाबत झहीर पुढे म्हणतो, “गंमत म्हणजे या चर्चा एका साध्या फोटोमुळे सुरू झाल्या. आम्ही आमच्या पाळीव श्वानासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली की, ओह.. ती प्रेग्नंट आहे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे, असा मला प्रश्न पडला होता.” झहीरचं बोलणं झाल्यावर सोनाक्षी म्हणते, “लोक खूप वेडे आहेत.”

ऑक्टोबर महिन्यात सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या पाळीव श्वानासोबतचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, ‘इथे पुकी (pookie) कोण आहे, ते सांगा.’ यानंतर लोकांनी थेट दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी लग्न केलं. त्यानंतर शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील हॉटेलमध्ये त्यांनी जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हुमा कुरेशी, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ, रेखा, आदित्य रॉय कपूर, सलमान खान, रिचा चड्ढा यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपूरमध्ये दोन जिह्यांत गोळीबार मणिपूरमध्ये दोन जिह्यांत गोळीबार
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकली जिह्यात आज पुन्हा गोळीबाराच्या घटना घडल्या. कुकी आणि मैतेई समुदायात पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून...
हरियाणा स्टिलर्स-पाटणा पायरेट्स अंतिम झुंज
थोडक्यात: मोदींचा 29 डिसेंबरपासून दिल्ली निवडणूक प्रचार, पंजाबमध्ये बसला भीषण अपघात
ड्रीम इलेव्हनने मारली बाजी
बॉशचे संस्मरणीय पदार्पण
हिंदुस्थानवर दबाव वाढवण्यासाठी विराट टार्गेट; रवी शास्त्रीनी ऑस्ट्रेलियन्स मीडियाला सुनावले
हिंदुस्थानी महिलांची विजयाची हॅटट्रिक; तिसऱ्या सामन्यातही विंडीजचा उडवला धुव्वा