‘…हे तर पवारांनी केलेलं नाटक’, मारकडवाडी वादावरून पडळकरांनंतर आता दरेकरांचा थेट वार!
सोलापूर जिल्ह्यातलं मारकडवाडी हे गाव सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं आहे, येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान मॉक पोल घेण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी मारकडवाडीला भेट दिली. दरम्यान आज महायुतीचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या गावाला भेट दिली. या गावात माहयुतीची सभा झाली. या सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले’ असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
तालुक्यात शंभर गाव आहेत, मात्र हेच गाव निवडण्यात आलं. कारण धनगर समाज हा लोकशाही विरोधी आहे असं शरद पवार यांना दाखवायचं होतं असा आरोप देखील यावेळी गोपीचंद पडकर यांनी केला आहे. दरम्यान आता पडळकर यांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर?
मारकडवाडी इथे जनतेचा आक्षेप नाही, शरद पवार आणि महाविकास आघाडीनं केलेलं हे नाटक आहे. सदाभाऊ, गोपीचंद पडळकर तिथे गेले होते, त्यावेळी खरे गावकरी तिथे उपस्थित होते. ईव्हीएमवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे. राम सातपुतेंची ही भावना समजून घ्या, राग समजून घ्या, चुकीचं कुणाला वाटत असेल तर कारवाईची मागणी करू शकता. त्यांच्या भाषणाचा वेगळा अर्थ काढू नका. उत्तम जानकरांनी आपली आमदारकी टिकवावी, त्यांचं सर्टिफिकेट फेक आहे. कोर्टात केस सुरू आहे. ईव्हीएमने आमदार झाले त्यावर त्यांचा विश्वास नाही. क्षमता पाहून बोलावं असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे उत्तम जाणकर यांनी देखील गोपीचंद पडळक यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. असली बारीक 5 उंदर पवार साहेब रोज नाष्ट्याला खातात. ही उंदर तिथे जाऊन टीका करतात असं जणाकर यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List