तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यावरून नाल्यासोपाऱ्यात तुफान राडा झाला. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे फोटो आता समोर आले आहेत.यावरून तब्बल साडेतीन तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं होतं.आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘नालासोपाऱ्याची जी घटना आहे, त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे.पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा आणि आमची निवडणूक यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ज्या स्पॉटवर ही घटना घडी तीथे आमची फ्लाईग स्कॉड पोहोचलेली आहे. तेथील परिसर आणि हॉटेलची पाहाणी आणि तपासणी फ्लाईग स्कॉड मार्फत केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे.पोलीस यंत्रणेची प्राथमिकता ही कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आहे. त्याचबरोबर निवडणुकीसंदर्भातील कायद्यांचं काटेकोरपणे पालन होतय का? यावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे.
आचारसंहितेच्या नियमानुसार सायलेंड प्रिरियडमध्ये उमेदवाराला त्याचा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघात जाता येत नाही.कारण प्रचाराला बंदी असते. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीचे 48 तास हे सायलेंड प्रिरियड असतात.त्या काळात प्रचाराला बंदी असते. त्यामुळे या काळात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणं अपेक्षित नसल्याची’ प्रतिक्रिया अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List