Kantara 2 Teaser: हातात त्रिशूळ, रक्ताने माखलेलं शरीर.. ‘कांतारा 2’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!

Kantara 2 Teaser: हातात त्रिशूळ, रक्ताने माखलेलं शरीर.. ‘कांतारा 2’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!

‘होम्बाले फिल्म्स’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपैकी एक आहे. या प्रॉडक्शन हाऊसने आतापर्यंत ‘केजीएफ: चाप्टर 2’, ‘अ लेजंड’, ‘सलार: पार्ट 1’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता या निर्मिती संस्थेचा सर्वांत मोठा प्रोजेक्ट ‘कांतारा: चाप्टर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याचाच हा दुसरा भाग आहे. मात्र त्यात ‘कांतारा’च्या आधीची कथा दाखवण्यात येणार असल्याने याला ‘प्रीक्वेल’ असं म्हटलंय. 1 मिनिट 22 सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीचा यापूर्वी कधीही न पाहिलेला लूक दिसून येत आहे. केवळ हा टीझर पाहिल्यानेही अंगावर काटा उभा राहतो.

या टीझरमध्ये दाखवलंय की शिवा (ऋषभ) जंगलात टॉर्च घेऊन जात असतो, तेव्हा त्याला आकाशातून एक आवाज ऐकू येतो. तो आवाज म्हणतो, “प्रकाश.. प्रकाशात तर सर्वांना सर्वकाही दिसतं. मात्र हा प्रकाश नाही, दर्शन आहे. जे घडलं, जे घडणार आहे ते सर्वकाही दाखवणारा प्रकाश.. दिसतोय का?” यानंतर शिवाचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश एका गुहेच्या तळाशी पोहोचतो, तेव्हा त्रिशूळ हातात घेतलेला आणि रक्ताने माखलेला एक मनुष्य दृष्टीस पडतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, त्याचे केस लांब आहेत आणि त्याच्या डोळ्यात धगधगती आग पहायला मिळतेय. ऋषभ शेट्टीचा हा लूक दाखवताना पार्श्वसंगीतही त्याच तोडीचं ऐकायला मिळतंय. या चित्रपटाची कथा कदंब राजवंशाच्या काळातील असल्याचंही टीझरमध्ये दाखवलं गेलंय.

पहा टीझर-

या चित्रपटाची कथा ऋषभनेच लिहिली असून त्याचं दिग्दर्शनही त्यानेच केलंय. 2022 मध्ये ‘कांतारा’ या चित्रपटासाठी ऋषभला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता ‘कांतारा: चाप्टर 1 – अ लेजंड’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय किरागंदुर यांनी होम्बाले फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

कांतारा म्हणजे काय?

‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये या वनदेवतेला खूप महत्त्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केले जातात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना...
नेत्यांच्या भाषणांमधील नको ते शब्द, हातवारे यांचा अर्थ मुलं विचारतात…, प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेत
“विवाहित पुरुषाला डेट करण्याचा पश्चात्ताप..”; विक्रम भट्टसोबतच्या अफेअरवर सुष्मिता काय म्हणाली?
रिया सेनच्या वडिलांचं निधन; ॲम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्याचा मुरब्बा, जाणून घ्या रेसिपी
पोळी की भात? जाणून घ्या रात्रीच्या जेवणासाठी काय खाणे फायदेशीर
भाजपचा खेळ खल्लास! विनोद तावडेंच्या पैसे वाटपावरून संजय राऊत यांचा निशाणा