बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या 18 नोव्हेंबर रोजी थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना समोर आला आहे. मुंबईत शिंदे गट आणि उद्धव गटात पोस्टर वॉर रंगलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. ठाकरे गटावर जोरदार प्रहार चढवला आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर राज्यभर सोशल मीडियावर पण चर्चा रंगली आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना

बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रात त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या छायाचित्रासह यामध्ये वाक्य देण्यात आले आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेबांचे वाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी पण जाहिरात दिली आहे. भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे वाक्य त्यावर लिहिले आहे. त्यात सर्वात खाली बाळासाहेबांची मशाल असे वाक्य लिहले आहे. 19 जून, 1966 रोजी बाळासाहेबांचा जन्म झाला होता. तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले होते. त्यानंतर शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. तर दोन अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली.

उद्धव ठाकरे यांचे जास्त उमेदवार

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक आमदार बाहेर पडले. शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे आणि भाजप यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेतील दोन्ही गटात धुमश्चक्री सुरु असते. दोन्ही गट आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा दोन्ही गटांनी अनेक मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही गटात चुरस आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी दोन्ही गोटाचे टेन्शन वाढवले आहे. शिंदे गट महाराष्ट्राच्या निवडणुकीत 81 ठिकाणी जागा लढवत आहे. तर उद्धव ठाकरे गटाने 95 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले.. नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या...
‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का? व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात स्टार बनली
लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत सासरी ‘नाईट स्टे’ केल्याने भडकली सासू? समीरा रेड्डीचा खुलासा
गोविंदाची रॅली दरम्यान प्रकृती खालावली, तात्काळ रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?
‘अशा पद्धतीने नीच वागून..’; भडकलेल्या नयनताराचं धनुषला खुलं पत्र
बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
हाडांच्या मजबूतीसाठी रोज खा हे 3 पदार्थ, कॅल्शियमची भासणार नाही उणीव