ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई

ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठाही जप्त करण्यात आला आहे. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका ट्रकमधून 8,476 किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. ही चांदी जप्त करण्यात आली आहे.

मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. 8,476 किलोग्राम ही चांदी भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत 80 कोटी रुपये आहे.

चालकाला घेतले ताब्यात

अधिकाऱ्यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत तिचा वापर होणार होता का? त्याची चौकशी निवडणूक आयोगाचे पथक करत आहे.

नागपूरमध्ये मोठी कारवाई

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोने चांदी डायमंडचे दागिने आणि इतर साहित्य असे जवळपास 1 कोटी 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबईवरून नागपूरला पार्सल आले होते. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीसचे वरिष्ठ अधिकारी आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेचे अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तर आजपावतो 4 कोटीं 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त अवैध दारू,मादक द्रव्य या बरोबरच इतर मुद्देमाल करण्यात आला आहे. जिल्ह्यात खाजगी बसेस, एसटी बसेस याबरोबरच इतर चार चाकी तसेच उमेदवारांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट
गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात...
‘फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचवा’, रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
Geeta Kapur : ‘माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष…’, प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूर अजून अविवाहित का?
Sunny Deol : सनी देओलने त्या अभिनेत्रीला जवळ घेणं, मुलाला सहनच झालं नाही, तो थेट…
सुशांत मला सतत…, अभिनेत्यासोबत असलेले ‘प्रेमसंबंध’ मान्य करत साराचा खळबळजनक खुलासा
बद्धकोष्ठता दूर करायची मग ‘हे’ फळ भिजवून खा, लगेचच दिसतील परिणाम
काटेकोर डाएट, हेल्थी जेवण तरीही कमी वयात आजार; समंथापासून ते निक जोनसपर्यंत कित्येक बडे सेलिब्रिटी डायबिटीज पेशंट