प्रदूषणामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास वाढलाय? जाणून घ्या रामबाण उपाय

प्रदूषणामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास वाढलाय? जाणून घ्या रामबाण उपाय

वारंवार शिंका येता, अ‍ॅलर्जीचा जास्त त्रास होतोय, मग ही बातमी नक्की वाचा. दिल्लीसह अनेक ठिकाणी वायू प्रदूषण वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दमा, सीओपीडी आणि ब्राँकायटिस सारख्या आजारांचा धोका वाढतो. पण, नाकाशी संबंधित अ‍ॅलर्जी देखील या ऋतूत अनेकांना सतावते. यामुळे वारंवार शिंका येणे आणि सायनसची समस्या अधिक वाढते.

ही अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, पण तसे नाही. काही लोकांमध्ये अनुनासिक म्हणजेच नाकाशी संबंधित अ‍ॅलर्जी धोका जास्त असतो. याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

अनुनासिक अ‍ॅलर्जीमुळे काय होते?

नोएडामधील वरिष्ठ सल्लागार (ईएनटी विभाग) डॉ. बी. वागीश पडियार सांगतात की, मायक्रोबायोममधील असंतुलनामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्रिय होते. यामुळे अ‍ॅलर्जी उद्भवते. अनुनासिक एलर्जीमुळे शिंकणे, अनुनासिक रक्तस्त्राव आणि डोळ्यांची जळजळ होते.‘

पुढे डॉ. बी. वागीश पडियार म्हणतात की, ‘वाढत्या हवामानात किंवा धूळ, माती आणि प्रदूषणात एखादी व्यक्ती अधिक शिंकत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, त्या व्यक्तीचे मायक्रोबायोम बिघडले आहे. हे सहज ओळखता येतं. जर तुम्हाला बदलत्या ऋतूत अ‍ॅलर्जी असेल आणि ती दरवर्षी होत असेल तर हे लक्षण आहे.’

मायक्रोबायोम म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात मायक्रोबायोम असतो. मायक्रोबायोम आणि अ‍ॅलर्जी यांच्यातील संबंध असा आहे की, शरीरातील मायक्रोबायोमचे असंतुलन मायक्रोबायोममधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.

उपाय काय आहेत?

नाक साफ करणे: नाक नियमित पणे स्वच्छ करा.

मास्क: बाहेर पडताना मास्क घाला

अ‍ॅलर्जी तपासणी: अ‍ॅलर्जी तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या

मायक्रोबायोम तपासणी: मायक्रोबायोम तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या

औषधे : स्वत:च अ‍ॅलर्जीची औषधे घेऊ नका.

अँटीबायोटिक्स घेणे योग्य?

काही लोक सौम्य ऍलर्जी असूनही अँटीबायोटिक्स घेतात, परंतु हे किती अचूक आहे? यावर डॉ. वागीश सांगतात की, अशा प्रकारे अँटीबायोटिक्स घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. जास्त अँटीबायोटिक खाल्ल्याने शरीरात अँटीबायोटिक रेझिस्टन्स होऊ शकतो. त्यामुळे औषधांचा शरीरावर होणारा परिणाम थांबू शकतो. ही धोकादायक परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत अँटीबायोटिक्सचा शरीरावर परिणाम न होण्याचे प्रकार झपाट्याने वाढत असून यामुळे मृत्यूही होऊ शकतो.’

नाकाशी संबंधित अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार शिंका येणे आणि सायनसची समस्या अधिक वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे....
फडणवीस असो की अन्य कुणी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार, माझा नादी लागू नका; नवाब मलिकांचा इशारा
‘स्त्री’ बनणार आता ‘इच्छाधारी नागिण’; श्रद्धा कपूरची आगामी चित्रपटासह धमाकेदार एन्ट्री, तीन वर्षांची मेहनत रंग लाई
प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर, कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोप; ‘या’ चित्रपटाला हो म्हणणं शाहिद कपूरला महागात
ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बींची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, ‘आता फार उशीर…’
तरुण मुलाला दिला खांदा, 70 व्या वर्षी लेकीपेक्षा लहान मुलीसोबत लग्न, 4 लग्न करणारा अभिनेता आहे तरी कोण?
वारंवार लागते तहान? आरोग्यासाठी धोक्याची घंटा? तज्ज्ञ काय म्हणतात