Photo – दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

Photo – दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

दीपावली सणाच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. दिवाळी सणामध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विविध रंगाच्या आकर्षक फुलांच्या आरास मधील देवाचे गोजिरे रुप पाहून भाविकांचे डोळे अन् मन अधिकच सुखावत आहेत.

 या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू अंदाजे 250 किलो, पिंक फुले (कण्हेर) अंदाजे 35 किलो, अष्टर अंदाजे 300 किलो, हिरवा पाला अंदाजे 200 माळा, गुलाब 100 गड्डी, कमिनी 300 गड्डी, शेवंती 100 गड्डी इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे.

सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे.

या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे 25 कामगारांनी परिश्रम घेतल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येत आहे.

या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं आहे.

विविधरंगी फुलांची आणि पानांची मनमोहक सजावट भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ
टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईचा वंडर बॉय रोहित शर्माच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी...
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार
माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले
Champions Trophy – ICC ने पाकिस्तानला ठणकावले, PoK मध्ये ट्रॉफी नेण्यास मनाई
मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही; अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका
अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून घ्या
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?