फटाके फोडण्यावरून वाद, मुंबईत 20 वर्षीय तरुणाचा भोसकून खून
मुंबईत फटाके फोडण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यात एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विवेक गुप्ता असून तो अँटॉप हिलचा रहिवासी होती.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री काही स्थानिक रहिवासी एका गल्लीत फटाके फोडत होते. तेव्हा बाईकवरून कार्तिक आणि मोहन देवेंद्र हे तरुण तिथून जात होते. कार्तिक आणि मोहनने या स्थानिकांना दुसरीकडे फटाके फोडायला सांगितले. त्यावरून वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. काही वेळात कार्तिक तिथून निघून गेला.
थोड्यावेळानतर कार्तिक आपल्या पत्नी, भाऊ आणि काही लोकांसोबत परत आला. कार्तिक त्याच्यसोबत असलेल्यांनी लाठ्या-काठ्या आणि क्रिकेट बॅट आमली होती. तेव्हा परत वाद झाला. तेव्हा फटाके फोडणाऱ्यांपैकी कुणीतरी चाकू आणला होता, तो हाणामारीत खाली पडला. तेव्हा कार्तिकने तो चाकू उचलला आणि विवेक गुप्ताच्या पोटात खुपसला. यात विवेकचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List