महायुतीत बंडाचे निशाण फडकले
तिकीट वाटपापासून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. जागा वाटपानंतर उमेदवार न सापडल्याने मिंधे आणि अजित पवार यांच्या गटात भाजपने आपले चेलेचपाटे घुसवले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये 36 जागांकर बंडखोरी झाली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून नाराजांची मनधरणी केली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोक्हेंबर आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत महायुतीला बंडोबांची नाराजी दूर करावी लागणार आहे. बंडोबा त्यांच्या भूमिकेकर ठाम राहिले तर राज्यात सुमारे 50 जागांवर महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोर आणि नाराजांमुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List