आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी; 234 कोटींचा ऐवज जप्त
निवडणूक आचारसंहिता भंगाच्या घटनांकडे जागरूक नागरिकांचे बारीक लक्ष आहे. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ या ऍपवर 2062 तक्रारी आल्या. त्यापैकी 2059 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून पैसे, दारू, ड्रग्ज आणि सोने-चांदी मिळून 234 कोटी 49 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पोलीस, कस्टम, उत्पादन शुल्क विभाग, महसूल विभाग आदी 19 यंत्रणा आचारसंहितेच्या काळात दक्ष आहेत. या यंत्रणांकडून विविध ठिकाणी पैसे, दारू, ड्रग्ज आदी जप्त करण्यात आले. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List