Sharad Pawar interview : महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar interview : महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीवर प्रसारीत झाली आहे.  ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक खुलासे केले असून, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या लाडकी बहीण योजना हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील एक प्रमुख मुद्दा ठरला आहे, यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या योजनेवर आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

लाडकी बहीण म्हणजे सरकारी तिजोरीतून पैसे देणे. काही राज्यात पैसे मतांसाठी वाटतात. इथे दुसरं काय केलं. नाव गोंडस दिलं. पैसे सरकारी तिजोरीतून काढले आणि वाटप केले. लोक शहाणे आहेत. पैसे घेतात आणि दुसऱ्यांना मतदान करतात. मागच्या निवडणुकीत पाहिलं. पैसे वाटप झाले. लोकांनी पैसे घेतले पण मतदान करताना विरोधकांना दिलं. पैसे वाटण्याचा काही परिणाम झाला नाही. ज्यांनी पैसे वाटले ते पराभूत झाले. संसदीय लोकशाहीत लोक सजगपणे निर्णय घेतील. पैशाने प्रयत्न होईल, थोडाबहुत फरक पडेल,  पण निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल असं वाटत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या इलेक्शनची कँपेन म्हणजे लोकांचा पूर येतो. ज्यावेळी मतदान होईल तेव्हा आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात असेल. लोकांच्या मनात परिवर्तन आहे. फक्त दडपशाही, दबाव, दहशत या सर्व गोष्टी निवडणुकीत दिसत आहेत. पण शांतपणे सर्व होईल. लोकसभेतही असंच चित्र होते. विरोधकांची कँपेन शांतपणे सुरू होती. पाच वर्षापूर्वी काँग्रेसला एक जागा आणि आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या, मात्र  आता आम्हाला ३० जागा मिळाल्या. लोक शांतपणे निर्णय घेतात. रिअॅक्ट करत नाहीत. परिवर्तन करतात. या निवडणुकीत तेच होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?
महायुतीचा मुख्यमंत्री हा संख्याबळावर ठरणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार...
विषारी हवा आणि संसर्गापासून वाचवतील व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळे
पुरुषांमधील वंध्यत्वावर ‘हा’ उपाय ठरेल रामबाण
ठाण्यात मिंध्यांनी आचारसंहिता खुंटीला टांगली, महिलांना साड्यांचे वाटप; शिवैसनिकाकडून भंडाफोड
Health Tips: 21 दिवस सतत रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर खोटे आरोप: रमेश चेन्नीथला
कामे अर्धवट असतानाही विशिष्ट व्यक्तीसाठी उद्घाटन केलं जातं, बीकेसीत आग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका