मृणाल दुसानिसचं 4 वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये कलाकारांची फौज
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मल्टीस्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ असं या मालिकेचं नाव असून त्यावरूनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशिब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट प्रेक्षकांना ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पहायला मिळणार आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे.
जवळपास चार वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिऱेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. स्टार प्रवाहच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर या मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील ही भूमिका साकाणार आहे. हजरजबाबी, प्रेमळ आणि खोडकर असणारी काव्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असते. ‘देवयानी’नंतर जवळपास आठ वर्षांनंतर विवेक सांगळे स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. मिश्किल स्वभावाचं जन्नेजय हे पात्र तो या मालिकेत साकारणार आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतला युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत जन्मेयजच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुख ही भूमिका साकारणार आहे. शांत आणि सुस्वभावी असणारा पार्थ सहसा कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा कशा एकत्र येतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “प्रेमविवाहावर भाष्य करणाऱ्या मालिका आपण याआधी पाहिल्या आहेत. पण अरेंज्ड मॅरेजची गोष्ट थोडी वेगळी आहे. लग्नानंतर त्या व्यक्तीवर प्रेम हे होतंच. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हण्टलं जातं. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी जे नशिबात आहे ते होणारच. अशीच एक गुंतत जाणारी आणि गुंतवून ठेवणारी हृदयस्पर्शी मालिका रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. लग्नासोबत खूप भावना आणि अपेक्षा जोडलेल्या असतात. ही भावनिक मालिका त्याच गोष्टी मांडेल”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List