निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आपल्या फेऱ्यांच्या वेळात बदल केलेला आहे. पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर ते मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत.
विधानसभा निवडणूकीचे मतदान असणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी वर्सोवा ते घाटकोपर मुंबई वन मेट्रोची पहिली फेरी पहाटे 4 वाजता सुटेल. आणि शेवटची फेरी दोन्ही स्थानकावरुन ( 21 नोव्हेंबर रोजी ) मध्यरात्री 1 वाजता सुटणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर इलेक्शन ड्यूटीसाठी वेळेत पोहचण्यासाठी ड्युटीसाठी मेट्रो वनच्या फेऱ्या सकाळी लवकर आणि रात्री उशीरा सोडण्यात येणार आहेत.
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सुविधा
मुंबई मेट्रो प्रशासनाने मेट्रो मार्गाशी कनेक्टेट असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर निवडणूक कर्मचाऱ्यांना या वेळेत लोकल मिळेल अशी तजवीज रेल्वे प्रशासनाने करावी असे आवाहनही मुंबई मेट्रो वन प्रशासनाने केले आहे. निवडणूक काळात पोलिंग बुथवर साहित्य घेऊन पोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोय देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मेट्रो वन प्रशासनाने म्हटले आहे. एरव्ही मेट्रो वनची पहिली फेरी घाटकोपरहून सकाळी 5.30 वाजता आणि शेवटची फेरी रात्री 11.45 वाजता सुटते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List