लातूरचा बदला मुंबईत; भाजपची काँग्रेसला धोबीपछाड, हा बडा नेता लागला गळाला
मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राजा भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस नेते रवि राजा थोड्याचवेळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.
निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. जागा वाटपावरून अनेक मतदारसंघात नाराजी आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे महायुती आणि महाविकास आघडीसमोर निर्माण झाला आहे. तर त्यातच काही नाराजांना आपल्या गोटात घेण्याचा, त्यांना भविष्यात पुनर्वसनाचा शब्द देऊन खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गट एकमेकांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मतदारसंघात असेच चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी धुमश्चक्री अनेक मतदारसंघात दिसत आहे.
लातूरचा बदला मुंबईत
लातूरमध्ये अमित देशमुख यांनी जाहीर सभेत भाजपला मोठा धक्का दिला. भाजपने लातूर लोकसभेच्या रिंगणात माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उतरवले होते. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ते नाराज असल्याचे बोलले जात होते. काल त्यांनी अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या मंचावर त्यांनी भाजपवर आघात केला. आपल्याला भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा आरोप केला. त्याचे पडसाद आज मुंबईत दिसले. भाजपने काँग्रेसला येथे खिंडार पाडले. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राजा भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस नेते रवि राजा थोड्याचवेळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
तिकीट न दिल्याने रवी राजा नाराज
रवी राजा हे सायन कोळीवाडा या मतदारसंघातून भाजपविरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती. पण काँग्रेसने या मतदारसंघातून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ते नाराज झाले. उमेदवार बदलेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांची काही वर्णी लागली नाही. राजा हे बंड करतील हे नक्की होते. त्यानुसार ते भाजपामध्ये जात आहेत. भाजपने सायन-कोळीवाडा मतदारसंघातून कॅप्टन तमील सेल्वन यांना उमेदवारी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List