शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त
शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखे धोकादायक आजार होऊ शकतात. डोकेदुखी, चक्कर येणे, हातपाय थंड पडणे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास श्वास घेण्यास देखील त्रास होतो. त्वचा पिवळी पडू लागेल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की रक्त वाढवण्यासाठी काय खावे. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सर्वप्रथम लोहयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते. लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताचे प्रमाण वेगाने वाढते.
दूधही आणि चीज यासारखे दुग्धजन्य पदार्थ देखील शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतात. जे रक्तपेशींचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
यासोबतच शक्य असल्यास गुळ आणि शेंगदाण्याचे सेवन करा कारण ते शरीरात ऊर्जा तसेच रक्त वाढवण्यास मदत करतात यासोबतच पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते.
पालक,बीट, डाळिंब आणि गूळ हे लोहाचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे रक्त वाढवण्यास खूप उपयुक्त ठरतात. या व्यतिरिक्त संत्री, लिंबू आणि आवळा यासारखी व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेली फळे खाल्ल्याने देखील लोहाचे प्रमाण वाढते. हे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. यासोबतच मासे, अंडे आणि चिकन खाल्ल्याने रक्त वाढायला मदत होते.पण हे संतुलित प्रमाणातच खाणे आवश्यक आहे.
ज्या लोकांना अशक्तपणा आहे त्यांनी B 12 आणि फॉलिक ऍसिड ची काळजी घ्यावी. कारण ते रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. B 12 ची योग्य पातळी राखण्यासाठी दूध आणि अंडी हे चांगले पर्याय आहेत. शाकाहारी लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार B 12 चे सप्लीमेंट्स घेऊ शकतात. फॉलिक ऍसिड साठी आहारात हिरव्या पालेभाज्या, वाटाणे आणि कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. तांब्यापासून कमी प्रमाणात लोह पाण्यात विरघळते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List