दहा वर्ष डेट अन् नंतर लग्न; पण हनिमूनच्या मुलीला असं काही समजलं की बसला जबरदस्त धक्का

दहा वर्ष डेट अन् नंतर लग्न; पण हनिमूनच्या मुलीला असं काही समजलं की बसला जबरदस्त धक्का

लग्नानंतर नवविवाहीत दाम्पत्याने हनिमूनला सुंदर ठिकाणी फिरायला जाणे आणि एकमेकांसोबत क्वालिटी वेळ घालवणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. प्रत्येक मुलीला तिचा हनीमून अविस्मरणीय बनवायचा असतो. पण अलीकडेच एका मुलीचे हनिमूनला घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला तो एकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

बायकोसोबत हनिमूनला जाताना आईलाही घेतले बरोबर

अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर ट्रेसी आणि ब्रायन या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ट्रेसी आणि ब्रायन यांना लग्नापूर्वी दोन मुले आहेत. ‘आय लव्ह अ ममाज बॉय’ या नावाच्या एका टिव्ही शोमध्ये हा हनिमूचा सांगितलेला किस्सा सर्वत्र आता व्हायरलं झाला आहे. कारण ब्रायनने हनिमूनला त्याच्या आईलाही सोबत घेतले होते. यावर त्याला प्रश्न विचारताच तो म्हणाला ‘माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे.’

Tracy and Brian Shocking Honeymoon story

Tracy and Brian Shocking Honeymoon story

ब्रायनने पुढे असं करण्याचं कारण सांगितले की, त्याची आई जेन यांनी स्वतः कधीही लग्न केले नाही. म्हणूनच ट्रेसी आणि ब्रायन लग्नाचा हा दिवस त्याच्या आईसाठीही खास असावा अशी ब्रायनची इच्छा होती. म्हणून त्याने हनिमूनला त्याला आईलाही बोलावलं होतं.

नवऱ्याच्या मतावर ट्रेसीची नाराजी 

या प्रसंगावर ट्रेसीला विचारले असता ती म्हणाली, ‘मला जेनसोबत माझे अनेक क्षण शेअर करायचे आहेत कारण ब्रायन प्रत्येक गोष्टीत त्याच्या आईचा समावेश करतो. ब्रायनशी लग्न करणे म्हणजे त्याच्या आईशीही लग्न करणे.उलट मी ब्रायनला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते. आमच्या लग्नानंतर ब्रायनने मला न सांगता त्याच्या आईला आमच्या हनिमूनला बोलावले होते. ब्रायनने मला त्याच्या योजनेबद्दल नंतर सांगितले” असे म्हणतं तिने नाराजी व्यक्त केली.

Tracy and Brian Shocking Honeymoon story

ब्रायनने जे काही केलं त्यासाठी ट्रेसीने काहीही म्हटले नाही. ते सर्वजण आपल्या दोन मुलांसह आणि आईसह हनिमूनसाठी हवाईला गेले. ट्रेसी आणि ब्रायनच्या हनीमून दरम्यान, जेन संपूर्ण वेळ त्यांच्या मुलांची काळजी घेत होती, त्यामुळे ट्रेसीला देखील कोणतीही समस्या आली नाही.

Tracy and Brian Shocking Honeymoon story

तथापि, हवाईमध्ये आपल्या मुलासोबत वेळ घालवण्याव्यतिरिक्त, जेनच्या काही इतर योजना देखील होत्या. जेव्हा ट्रेसी आणि ब्रायन त्यांच्या हनीमूनचा आनंद घेत होते, तेव्हा जेन देखील हवाईच्या एका बारमध्ये खूप एन्जॉय करत होती.

सासूने केलेल्या कृत्यामुळे ट्रेसीला राग अनावर 

मात्र नंतर जे झालं ते धक्कादायकच होते असं ट्रेसीने सांगितले. ट्रेसी आणि ब्रायन हॉट टबमध्ये एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होते. तेवढ्यात अचानक जेनही जकूझीमध्ये आली. जेव्हा ब्रायनने आपल्या आईला तिच्या मुलांबद्दल विचारले तेव्हा जेनने सांगितले की तिने दोन्ही मुलांना बेबीसिटरकडे सोडले आहे.

Tracy and Brian Shocking Honeymoon story

Tracy and Brian Shocking Honeymoon story

जेनने ब्रायनला सांगितले, ‘मला कळले की हॉटेलमध्ये बेबीसिटिंगची सेवा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मुले त्यांच्याकडे सुरक्षित आहेत”. हे ऐकून ट्रेसीला इतका राग आला की ती लगेच उठून बाहेर गेल्याचे तिने सांगितले.

ट्रेसीने नक्कीच तिच्या सासूच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत तिने जे केले ते चुकीचे होते असं स्पष्टपणे त्या शोमध्ये सांगितले. हा किस्सा व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्रेसीच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या