परवीन बाबीसोबत हेमा मालिनी यांचा किसींग सिन, प्रेक्षक चित्रपटच पाहायला गेले नाहीत तेव्हा…

परवीन बाबीसोबत हेमा मालिनी यांचा किसींग सिन, प्रेक्षक चित्रपटच पाहायला गेले नाहीत तेव्हा…

परवीन बाबीसोबत हेमा मालिनी यांचा किसींग सिन, लोकं चित्रपट पाहायलाच गेले नाही; अख्खी फिल्म इंडस्ट्री कर्जबाजारी झाली होती

1970 आणि 80 च्या दशकातला सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे  ‘शोले’. आजही हा चित्रपट लोकं अगदी कितीवेळा पाहातात. शोले रिलीज झाल्यानंतर चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांनी त्याच प्रमाणात पीरियड ड्रामा बनवण्याचा निर्णय घेतला. जो चित्रपट होता ‘मुघल-ए-आझम’.  हा चित्रपट बनवायला तब्बल सात वर्ष लागली. पण त्याचे परिणाम पुढे वाईट झाले की  हा चित्रपट बनवता बनवता  फिल्म इंडस्ट्री कर्जात बुडाली होती.

Razia Sultan movie

10 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला चित्रपट सुपर फ्लॉप ठरला 

रझिया सुलतान, कमाल अमरोही यांचा भारतातील एकमेव महिला मुस्लिम शासकाचा बायोपिक आहे. 1983 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. असं म्हटलं जातं की, त्या काळी  हा चित्रपट 10 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्यामुळे तो त्यावेळचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला होता.

Razia Sultan movie

या चित्रपटात हेमा मालिनी मुख्य भूमिकेत होत्या. धर्मेंद्र, परवीन बाबी, सोहराब मोदी आणि अजित हे कलाकरा देखील या  चित्रपट झळकले. हा चित्रपट रिलीज होताच फ्लॉप ठरला. प्रेक्षकांना चित्रपटात वापरलेली उर्दू भाषा फारच अवघड वाटली, तर काहींनी चित्रपटाच्या लांबलचक ड्युरेशनची तक्रार केली.

तसेच गुलाम योद्धा याकूतच्या भूमिकेसाठी धर्मेंद्रचा ब्लॅकफेसमध्ये वापर करण्यात आला होता. प्रेक्षकांना हे फारच विचित्र वाटलं होतं. या सर्व कारणांमुळे सर्वात महागडा चित्रपट तेव्हा पुरता बुडाला. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा महागडा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त 2 कोटी रुपयांची कमाई करू शकला.

Razia Sultan movie

दोन अभिनेत्रींच्या किसिंग सीनवरून वाद

रझिया सुलतानमध्ये टायट्युलर राणीच्या एकाकीपणाबद्दलही सांगण्यात आले होते. या चित्रपटात तिचा याकूतसोबतचा प्रणय दाखवण्यात आला होता. पण, तिची जोडीदार खाकुन जी भूमिका परवीन बाबी यांनी साकारली होती.  दोन महिलांचे  प्रेमाचे नाते दाखवण्यासाठी गालावर एक चुंबन घेण्याचा सीन ठेवण्यात आला.

Razia Sultan movie

प्रेक्षकांमध्ये या चुंबनाचं समलैंगिक चुंबन म्हणून वर्णन करण्यात आलं. त्यामुळे चित्रपटाला आणखी नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. कौटुंबिक प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास नकार दिला आणि मुस्लिम धर्मगुरूंनीही चित्रपटात मुस्लिम महिलांच्या ‘अयोग्य’ चित्रणावर आक्षेप घेतला होता.

महागड्या चित्रपटामुळे फिल्म इंडस्ट्री कर्जबाजारी झाली होती

रजिया सुल्तान चित्रपट तयार करण्यासाठी शोले चित्रपटापेक्षा 60 टक्के अधिक खर्च झाला होता. अमरोही यांनी चित्रपट उद्योगाकडून कर्ज घेतलं होतं आणि चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनेक क्रू मेंबर्सचे पैसेही रोखून धरले होते. तसेच, सर्व पैसे रिलीजनंतर ते परत करण्याचे आश्वासन दिलं होतं. पण चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे अमरोही यांनी स्वतःच्या खिशातून अनेकांचे पैसे चुकते केले. IMDb नुसार, जवळजवळ संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कर्जबाजारी झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिनश्नोई याला अमेरिकेत...
आम्ही 24 तासात अण्विक क्षमता विकसित करू शकतो; रशियाच्या इशाऱ्यानंतर इराणची धक्कादायक आण्विक घोषणा
विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं!
दिग्दर्शकावर गोळीबार केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेत्याला अटक, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
विरारमध्ये पुन्हा तेच! तावडेंनंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडले, धूधू धुतले
उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करा, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र
विरारमध्ये वाटपासाठी 5 कोटी आले होते, त्यातील फक्त 9 लाख दाखवले आणि इतर रक्कम गायब केली; हितेंद्र ठाकूर यांचा आरोप