लग्नानंतर ईशा देओलवर लादण्यात आली बंधनं, घटस्फोटानंतर अभिनेत्रीने सांगितलं धक्कादायक सत्य
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी ईशा हिने उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केली. ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दोन मुलींच्या जन्मानंतर ईशा – भरत यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, 2012 मध्ये ईशा – भरत यांचं लग्न झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर ईशा हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अम्मा मिया’ या पुस्तकात ईशा देओलने खुलासा केला होता की लग्नानंतर तिच्या आयुष्याच फार मोठे बदल झाले. लग्नानंतर अभिनेत्रीवर अनेक बंधनं देखील लादण्यात आली होती.
ईशाने पुस्तकात लिहिलं होतं, ‘लग्नानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. मी अधिक समजदार झाली. भरत याच्या कुटुंबियांसोबत राहात असताना मी घरात शॉर्ट्सवर फिरू शकत नव्हते… पण लग्नाआधी मझ्यावर कोणतीच बंधनं नव्हती…’
सासरच्या प्रथा आणि परंपरेबद्दल देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. ‘घरातील प्रत्येक महिला नवऱ्यासाठी जेवणाचा डब्बा भरायची. भरत याला भेटण्यापूर्वी मी कधी जेवण देखील बनवलं नव्हतं… ‘ असं सांगत ईशा देओल हिने सासूबाईंचं कौतुक देखील केलं.
ईशा म्हणाली, ‘सासूबाईंनी मला कधीच स्वयंपाक घरात जाऊ दिलं नाही. त्यांनी कधीच माझ्यावर कोणती बळजबरी केलं नाही. रूढीवादी गोष्टी करण्यासाठी त्यांनी कधीच दबाव आणला नाही… सासरी त्यांनी माझा सांभाळ एका मुलाप्रमाणे केला. त्यांनी मला तिसऱ्या मुलासारखं जपलं…’ असं देखील ईशा देओल हिने पुस्तकात लिहिलं आहे.
भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्यामध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर ईशा – भरत यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List