उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू
43 आसनी बसमध्ये तब्बल 60 प्रवाशी काsंबून नेणारी बस उत्तराखंडच्या अल्मोडा जिह्यातील मार्चुला येथे दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी काsंबल्यामुळे वाहनचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूण 24 प्रवाशी जखमी असून त्यातील 4 गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 10 महिलांचा समावेश आहे.
पाऊरी येथून कुमाऊ येथील राम नगर येथे बस जात होती. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळच्या सुमारास मार्चुलू येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती जिल्हा महानगर दंडाधिकारी आलोक कुमार पांडे यांनी दिली. घनदाट जंगल, डोंगर, खडक आणि तीव्र घसरण यामुळे बस दरीत कोसळल्यानंतर मृतांचा आकडा वाढला. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पौरी आणि अल्मोडाचे सहाय्यक विभागीय वाहतूक अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेत्यांकडून श्रद्धांजली
या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवरून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृत प्रवाशी आणि जखमींच्या कुटुंबियांना लागेल ती मदत करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
मृतांना केंद्राकडून 2 लाख तर राज्याकडून 4 लाखांची नुकसानभरपाई
मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी 4 लाख आणि जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जखमींना राम नगरनजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चारपैकी तीन गंभीर जखमींना ऋषीकेश येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List