जुन्नरमध्ये महाविकास आघाडीचा मार्ग सुकर; महायुतीत बिघाडी
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुण्यातील 8 विधानसभा मतदार संघात बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. जुन्नरच्या विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला असून महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचे शरद सोनवणे, भाजपच्या आशाताई बुचके यांनी अपक्ष म्हणुन उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असून मार्ग सुकर झाला आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता एकूण 11 उमेदवार आहेत. अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेतकर , वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे , माजी आमदार शरद सोनवणे , आशाताई बुचके यांच्यासह आणखी सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आशाताई बुचके व शरद सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. ज्ञानेश्वर खंडागळे, जुबेर अस्लम शेख ,योगेश तोडकर, काळू गागरे ,रमेश पाडेकर, निलेश भुजबळ या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार असल्याचे बंडखोरी होणार नसल्याने मतविभाजनाचा धोका टळला असून महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाल्याचे मानण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List