निवडणूक जिंकण्यासाठी सांगलीत जादूटोणा, सापडलेल्या वस्तू आणि चीठ्ठीमुळे खळबळ
सांगली जिल्ह्यात निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोणा आणि भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक जिंकायची आणि विधानसभेत पोहोचायचे यासाठी उमेदवार सर्व शक्ती पणाला लावत आहेत. राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात केली जात आहे. त्यातच सांगली शहरातल्या टिंबर भागामध्ये जादूटोणा आणि भानामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बॉक्समध्ये भानामती करण्यात आलेले कवळ फळ, काळी बाहुली, फुले,अंडी आणि लिंबू आढळून आलेले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बॉक्समध्ये काय आढळले
भानामती करण्यात आलेल्या सर्व वस्तू एका बॉक्समध्ये रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्या होत्या. या बॉक्समध्ये कन्नड अक्षरांमध्ये विरोधकांचा नाश व्हावा असा मजकूर एका कागदावर लिहीण्यात आल्याचे आढळून आले. विरोधक म्हणजे नक्की कोण? हा प्रकार कुणी केला याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List