कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मंत्री झाले, पण याची त्यांना आठवण राहिली नाही; शरद पवार यांचा अजित पवारांना टोला

कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मंत्री झाले, पण याची त्यांना आठवण राहिली नाही; शरद पवार यांचा अजित पवारांना टोला

कार्यकर्त्यांनी मेहनत केली म्हणून आपले काही सहकारी मंत्री झाले पण त्यांना याची आठवण राहिली नाही, शरद पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका केली. तसेच विरोधात असणाऱ्याला अडचणीत आणण्याची भुमिका आजचे नेते घेतात असेही शरद पवार म्हणाले.

बारामतीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी काही कार्यकर्ते त्यांना भेटायला आले होते. तेव्हा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, 2019 साली आपण 54 जागा जिंकल्या. पण सत्तेचा गैरवापर करून आताचे सरकार स्थापन झाले. एकेकाळी देशात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आता तोच महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्या लोकांना याची जाण नाही, जिल्ह्यातील सामान्य माणासाचे हित जपण्यासाठी त्यांना आपण पदं दिली, कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून ते मंत्री झाले. पण या सगळ्यांची आठवण आपल्या सहकाऱ्यांना राहिलेली नाही अशी टीका शरद पवार यांनी केली.

1980 साली माझ्या पक्षातून 58 आमदार निवडून आले होते असे शरद पवार म्हणाले. मी कामानिमित्त परदेशात गेलो तेव्हा 58 पैकी 52 आमदार मला सोडून गेले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत 58 पैकी 52 उमेदवार पराभूत झाले होते असेही पवार यांनी सांगितले.

ट्रम्पेट या चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने रद्द केले आहे. त्यामुळे आपल्याला फटका बसणार नाही असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर...
उद्धव ठाकरे यांची तोफ आज कल्याण,  डोंबिवली, ठाण्यात धडाडणार
‘मनसे’ म्हणजे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष, आदित्य ठाकरे यांचा जबरदस्त घणाघात
संजू, तिलक शतकाधिश! हिंदुस्थानने विदेशी भूमीवर रचला धावांचा एव्हरेस्ट
प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
महाराष्ट्राच्या तोंडातला घास गुजरातला देणारे हात छाटल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा