Devgad News- देवगड तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका, काही ठिकाणी नुकसान
देवगड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा, विजांच्या कडकटांसह झालेल्या मुसळधार पावसात देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील विकास अभिमन्यू आपकर यांच्या घराची मातीची भिंत पहाटेच्या सुमारास कोसळली, मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या विकास आपकर आपल्या कुटुंबीयांचे घराला 23 वर्षे झाली असून पहाटेच्या सुमारास स्वयंपाक खोलीची भिंत पडली. तर अन्य बाजूच्या भिंतीना देखील भेगा पडल्या आहेत, स्थानिक प्रशासन महसूल प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी पहाणी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आपकर कुटुंबीयांकडून होत आहे.
याबरोबरच जामसंडे बौद्धवाडी येथील सिद्धार्थ शांताराम जाधव यांच्या घराचे छप्पर या वादळी पावसात कोसळले त्यामुळे कुटुंबीयांची धावपळ झाली .त्यातच खंडित वीजपुरवठा समस्येला तोंड द्यावे लागले.या प्रभागाच्या नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली .या घटनेची माहिती नगरपंचायत व महसूल प्रशासनास देण्यात आली आहे.दरम्यान तालुक्यात अन्य काही भागात घरांची कौले छपरे यांचे नुकसान या वादळी पावसात झाले असून काही भागात वृक्ष छोटी मोठी झाले उन्मळून पडली प्रसंगी विद्युत वाहक तारांवर फांद्या पडून त्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List