न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी
न्यूयॉर्कमधील सरकारी शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे 1.1 दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांना दिवाळी साजरी करता येणार आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या गव्हर्नर पॅथी हॉचूल यांनी शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील शाळा बंद राहणार आहेत. अमेरिकेतील हिंदुस्थानींसाठी दिवाळीच्या सुट्टीचे विशेष महत्त्व आहे. दिवाळी सण एकतेचे प्रतीक असून या सणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे, मित्र आणि शेजारी एकत्र येणार आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर कार्यालयातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपायुक्त दिलीप चौहान यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List