अमित ठाकरे उमेदवारी मिळताच उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले; दोन शब्दातच बोलून गेले

अमित ठाकरे उमेदवारी मिळताच उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले; दोन शब्दातच बोलून गेले

Mahim Assembly Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अमित ठाकरे हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर काल मनसे पक्षाकडून अधिकृतरित्या अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अमित ठाकरे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह माहिम विधानसभा मतदारसंघांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केले. ठाकरे गटाकडून विरोधात उमेदवार देण्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही ते व्यक्त झाले.

“दादरचे प्रश्न सोडवणं अवघड नाही”

“मी साहेबांशी कधीही कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याबद्दल चर्चा केली नाही. माहिम हे नाव सर्वात आधी प्रसारमाध्यामांशी जाहीर केलं. तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता की जर आता साहेबांनी नाव जाहीर केलं नाही तर माझी लाज जाईल. मला या ठिकाणच्या समस्या माहिती आहेत. मला लोकांचे प्रश्न तोंडपाठ आहेत. मला समुद्रकिनारा स्वच्छ करायचा आहे. लोकांना अपेक्षा नसेल, असा समुद्रकिनारा मला करायचा आहे. माझे दरवाजे माहिमसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी उघडे असतात. माझ्यासाठी दादरचे प्रश्न सोडवणं अवघड नाही”, असे अमित ठाकरे म्हणाले.

“पक्षाला गरज होती. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आदित्यने सत्तेत असताना निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हा फार चांगला निर्णय होता. तेव्हा तो सत्तेत होता. भाजपसोबत ते सत्तेत होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं. पण आता आमच्या पक्षाची तशी परिस्थिती नाही. मी हा निर्णय घेणं आणि राज ठाकरेंनी माझ्यावर विश्वास ठेवणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. नितीन सरदेसाई यांचाही मला पाठिंबा आहे”, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.

“…तर साहेबांनी मला उभा केलं नसतं”

“आमचा प्रचार महायुती, महाविकास आघाडी दोघांच्याही विरोधात असणार आहे. 2019 नंतर जो चिखल झाला आहे, असं राजकारण मला लोकांपर्यंत न्यायचं नाही. ज्या नवीन कोणाला राजकारणात यायचं असेल, त्यांच्यापुढे हे राजकारण न्यायचं नाही. हे कुठे तरी थांबायला हवं. माझ्या राजकारणाची व्याख्या समाजकारण आहे. सत्तेत येईपर्यंत काहीही करा. पण सत्तेत आल्यानतंर तुम्ही लोकांची काम करायला हवे. मी साहेबांकडे कधी काही मागितलं नाही. त्यांनी मला काही दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्र सैनिकांचा आवाज ऐकला, 2015 सालापासून मी विद्यार्थी सेनेचे काम केलं. बातम्या नसत्या तर साहेबांनी मला उभा केलं नसतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आधी लोकांनी स्वीकारायला हवं आणि त्यानंतर मग नेत्यांनी स्विकारलं पाहिजे”, असेही अमित ठाकरे म्हणाले.

“काहीही फरक पडत नाही”

“बाळासाहेबांपासून, राज साहेबांपर्यंत इलेक्ट्रॉल पोलिटीक्स मध्ये कुणी आलं नाही. त्यामुळे विधानसभेत जाणं, प्रश्न मांडणे हे माझ्यातर्फे त्यांना पहिल्यांदा दिसणार आहे. मतांच्या राजकारणात उतरणं ही काळाची गरज आहे. रिमोट कंट्रोलचा जमाना हा राज साहेबांपर्यंतच आहे, साहेबांसारखी माझी पकड नाही. मला कुठेतरी या सर्व गोष्टीत सक्रीय व्हावे लागेल. माझ्या विरोधात उमेदवार दिला तरी मला काही फरक पडणार नाही. मी उद्यापासून प्रचार सुरु करणार आहे. मला त्यांनी उमेदवार दिला तरी काहीही फरक पडत नाही. मला उमेदवारी देणं हा साहेबांचा कॉल होता आणि निवडून आणणं हा लोकांचा कॉल आहे. माझा साहेब आणि जनता अशा दोघांवर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर सोडलं आहे”, असे अमित ठाकरेंनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अनेक जण भारतात राहत असले तरी देखील ते वेगनेगळ्या देशांचे...
उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका, शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा: मल्लिकार्जून खर्गे
‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी