अंबरनाथ – बदलापूर स्थानकादरम्यान तरुणीचा हात निसटला, लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथ – बदलापूर स्थानकादरम्यान तरुणीचा हात निसटला, लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसताना तरुणी रेल्वेत चढली. मात्र ती दारातच उभी होती. दरम्यान तिचा हात सुटला आणि ती ट्रॅकवर पडल्यामुळे गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. ऋतुजा गणेश जंगम (25) असे या तरुणीचे नाव असून ती कर्जतमधील म्हाडा कॉलनी येथे राहणारी रहिवाशी होती. मंगळवारी रात्री जॉबवरून घरी जात असताना ऋतुजाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास जवळपास सर्वच लोकल गाड्या कल्याणहून कर्जत आणि कसाराच्या दिशेने उशिराने धावतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी तिने अंबरनाथ स्टेशनवरून कर्जत लोकल पकडली. मात्र लोकलला गर्दी असल्यामुळे ती दारातच उभी राहिली होती. दरम्यान अंबरनाथ स्टेशन सोडल्यानंतर तिचा हात सुटला आणि ती ट्रॅकवर पडली.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा ‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसीत प्रचारसभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख...
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी
मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी वाचवणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन