अभिनेत्याचं चुलत बहिणीशी तिसरं लग्न, 2 वेळा घटस्फोट, कोट्यवधींची संपत्ती हातून जाण्याची भीती
‘लुसिफर’, ‘थंबी’ यांसारख्या चित्रपटांमधील प्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला ऊर्फ बालाकुमारने तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याने या लग्नाबद्दलची माहिती दिली. बालाने हे तिसरं लग्न त्याच्या नात्यातील कोकिला हिच्याशी केलं आहे. कोकिला ही बालाच्या मामाची मुलगी आहे. बाला आणि कोकिला यांनी एर्नाकुलम इथल्या कलूर पवकुलम मंदिरात लग्न केलं. या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते. कोकिला तमिळनाडूची असली तरी तिला मल्याळम भाषा बोलता येत नसल्याचं कळतंय. लग्नानंतर पत्रकारांशी बोलताना बालाने तिसऱ्या लग्नामागचं कारण सांगितलं. “माझ्या मते हे लग्न चांगलं टिकू शकेल. मला त्यावर पूर्ण विश्वास आहे कारण ती माझ्या नात्यातलीच आहे. माझ्या लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर मला एका जोडीदाराची खूप गरज होती. म्हणून मी हे तिसरं लग्न केलं”, असं तो म्हणाला.
बाला आणि कोकिला हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. नुकत्याच एका मुलाखतीत बालाने त्याच्या संपत्तीविषयी चिंता व्यक्त केली होती. “मी अत्यंत मेहनतीने कमावलेली 250 कोटींची संपत्ती हडपण्यासाठी कट रचला जातोय. ही संपत्ती सांभाळण्यासाठी मला कोणीतरी हवंय,” असं तो म्हणाला होता. बालाने गायिका अमृता सुरेशशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना अवंतिका ही मुलगी आहे. त्यानंतर त्याने एलिझाबेथशी लग्न केलं. बालाच्या या दुसऱ्या लग्नाची नोंदणी झाली नव्हती. बालाच्या तिसऱ्या लग्नापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली होती. पहिली पत्नी अमृता सुरेशने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियाद्वारे बालाने माझा अपमान केला, असा आरोप तिने केला होता. नंतर 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची जामिनावर सुटका झाली.
നാലാമത്തെ കല്യാണത്തിനായി വധു കോകിലയോടൊപ്പം ബാല അമ്പലത്തിൽ #Bala #marriage pic.twitter.com/t0oVeALYtz
— Filmy Monks (@filmy_monks) October 23, 2024
याआधी बालाने त्याच्या पूर्व पत्नीवर काही आरोप केले होते. अमृता त्याला मुलीची भेट होऊ देत नसल्याचं त्याने म्हटलं होतं. अमृता आणि बालाच्या मुलीनेही इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे. वडिलांच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला आणि तिच्या आईला ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, त्याविषयी ती या व्हिडीओमध्ये व्यक्त झाली. बाला हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे आजोबा अरुणालचा स्टुडिओजचे मालक होते आणि त्याच्या वडिलांनी जवळपास 350 हून अधिक चित्रपट आणि माहितीपटांचं दिग्दर्शन केलंय. बालाने 2002 मध्ये तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List