खबरदार! माझ्या नावावर पैसे गोळा कराल तर याद राखा!
निवडणुकीच्या काळात अनेकजण आपल्या नावाचा वापर करून पैसे गोळा करण्याची शक्यता आहे. परंतु खबरदार! माझ्या नावावर पैसे गोळा कराल तर याद राखा! असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी भरला आहे. पैसे गोळा करण्यात आल्याचे कळल्यास लोकवर्गणी करून ते पैसे परत करण्यात येतील असेही ते म्हणाले. दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी आंतरवालीत इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
सर्वपक्षीय उमेदवार आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याच अनुषंगाने 24 ऑक्टोबर रोजी आंतरवालीत इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात स्पष्ट भूमिका ठरवण्यात येईल, असे ते म्हणाले. एका मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात येईल. आम्ही उमेदवारांची यादी अंतिम करत आहोत, योग्य वेळी ती जाहीर करण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List