या काय समजतात स्वत:ला; हेमा मालीनींची चिडचिड पाहून नेटकऱ्यांचा संताप,थेट जया बच्चन यांच्याशी तुलना
Hema malini getting trolled: बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री हेमा मालीनी या अभिनयाबरोबर राजकारणातदेखील अधिक सक्रिय आहेत. तसेच त्यांच्या नृत्यकलेचेदेखील कौतुक केले जाते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांच्यात अजून जिवंत असलेल्या कलेला प्रेक्षकांची कायमच प्रशंसा मिळते. जुन्या पिढीसोबत नवीन पिढीच्याही हेमा मालीनी आवडीच्या अभिनेत्री आहेत. मात्र त्याच चाहत्यांनी आता त्यांना ट्रोलही केलं आहे.
हेमा मालीनी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. हेमा या काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी ईशा देओल पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावेळी त्यांनी लेकीला पाठिंबा दिला असल्याचेदेखील जाहीर केले होते. तेव्हा मुलीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे कौतुकदेखील केले तर काही अंशी ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.
हेमा मालीनी यांची मीडियावर चिडचिड
हेमा सध्या दिल्लीमध्ये असून नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांची वागणूक बघून खूप नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. तसेच त्यांची तुलना जया बच्चन यांच्याबरोबरही केली आहे. हेमा या दिल्ली येथे स्पॉट झाल्या. जेव्हा त्यांनी मीडियाला पाहिलं तेव्हा त्यांना खूप राग आला. पण त्यांनी कसाबसा त्यांचा राग आवरता घेतला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून आणि वागणुकीवरून हे सरळ सर दिसून येतं होतं की त्यांना हे आवडलेलं नाहीये. त्यानंतर त्यांचे काही चाहते सेल्फी घेण्यासाठी आले पण हेमा यांनी लांब उभे राहून फोटो काढण्यास सांगितले.
नेटकऱ्यांकडून ट्रोल
हेमा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हेमा मालीनी यांची ही वागणूक पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “या काय समजतात स्वत:ला, सामान्य माणसाला असे बघतात जसे त्यांना स्पर्श करणे चुकीचे आहे”, तर एकाने लिहिले आहे “खूप ओव्हरॲक्टिंग करत आहे”, दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “दुसरी जया व काजोल”, तसेच अजून एकाने लिहिले की, “ओव्हर करत आहेत या” अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List