Wadala Assembly Constituency : आताच नको पराभवाची चर्चा; रणात आहेत झुंजणारे अजून काही, वडाळ्यात कालिदास कोळंबकरांना मतांची खेप भेटेल की निवडणुकीचा पेपर जाईल कठीण?

Wadala Assembly Constituency : आताच नको पराभवाची चर्चा; रणात आहेत झुंजणारे अजून काही, वडाळ्यात कालिदास कोळंबकरांना मतांची खेप भेटेल की निवडणुकीचा पेपर जाईल कठीण?

मुंबईतील सात बेटांपैकी वडाळा (Wadala) हे महत्त्वाचे बेट होते. त्याचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. मराठी माणूस कोणत्या सेनेसोबत आहे हे येत्या विधानसभेच्या आखाड्यात स्पष्ट होईल. पण त्याअगोदर भाजपला हा विधानसभा समाविष्ट असलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातून राहुल शेवाळे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. वडाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या झोळीत मतांची बिदागी पडली नाही. त्यामुळे विद्यमान भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची वाट सोपी नसल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून श्रद्धा जाधव, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप इच्छुक असल्याची चर्चा आहे.

पोलिसांचे होमग्राऊंड

वडाळा विधानसभा मतदारसंघात पोलिसांची संख्या मोठी आहे. त्यामुळे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप (Sanjay Jagtap) यांचे नाव आघाडीवर आहेत. तर श्रद्धा जाधव यांचा पण दावा असल्याचे समोर येत आहे. कालिदास कोळंबकर यांची या विधानसभा मतदारसंघात चांगलीच पकड आहे. ते सलग आठ वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठी कार्ड खेळलं जाणार हे निश्चित आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघासाठी रस्सीखेच पाहायला मिळेल.

कोळंबकरांना तिसऱ्यांदा हॅटट्रिक साधणार?

कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambakar) यांची या मतदारसंघावर जबरदस्त पकड दिसून आलेली आहे. ते सलग आठ वेला या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1990 पासून कोळंबकर या मतदारसंघाचे एकटे शिलेदार राहिले आहेत. ते कट्टर राणे समर्थक मानण्यात येतात. नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पण शिवेसना सोडून काँग्रेस जवळ केली. मोदी लाटेपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्षांतर केले तरी मतदार मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकेल आहेत. तर नव्यांदा ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अनेक जण त्यांच्या पराभवाची चर्चा करत आहेत. तर त्यांचे समर्थक रणात आहेत झुंजणारे अजून काही, असे नारे देत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीचा सामना दिसणार आहे.

लोकसभेला मोठा दणका

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना दक्षिण-मध्य मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. त्यात वडाळा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना 70 हजार 931 मतं मिळाली होती. तर शेवाळे यांना 61,619 मतं मिळाली होती. सध्या राज्यात मराठा, मुस्लिम आणि दलित अशी वोट बँक बांधण्याचे काम सुरू आहे. वडाळा मतदारसंघात एकूण 2,04,905 मतदार आहेत. ते कुणाच्या ओंजळीत मतं टाकणार हे लवकरच समोर येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक  यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर ‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सांगायचं झालं तर, मुकेश...
… तर रोहित स्वत:च कसोटीतून निवृत्ती पत्करेल! कृष्णम्माचारी श्रीकांत यांचे भाकीत
लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने सलमान खानला पुन्हा धमकी; आठवड्यात पाच धमकीचे संदेश
भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ; उद्धव ठाकरे यांची आज अंबाडीत दणदणीत सभा
वार्तापत्र – नाशिक मध्य, पश्चिम, देवळालीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल
महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार