धारावीकरांच्या अक्सा आणि मालवणीत पुनर्वसनालाही विरोध

धारावीकरांच्या अक्सा आणि मालवणीत पुनर्वसनालाही विरोध

धारावी पुनर्वसन प्रकल्प अक्सा व मालवणी गावामध्ये राबवण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मढ गावामध्ये पार पडलेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत प्रकल्पाच्या विरोधात ठराव करण्यात आला. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टीधारकांसाठी अक्सा व मालवणीमध्ये जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पश्चिम उपनगरातील बोरिवली तालुक्यात येणाऱ्या मालाडमधील अक्सा आणि मालवणी गावाच्या परिसरात ही जमीन आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, अक्सा आणि मालवणी गावांमधील एकूण 140 एकर जमीन प्रचलित बाजार मूल्याच्या 100 टक्के वसूल केल्यानंतर डीआरपी/एसआरएला दिली जाईल. पण गावकऱ्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध केला. गावकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत भूमिपुत्रांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत अदानीच्या घशात घालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी घेतला आहे.

या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. धारावीच्या विकासासाठी भूमिपुत्रांना बाहेर काढणार का? भूमिपुत्र बांधवांच्या जमिनी अदानीच्या घशात घालणार का? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला. या बैठकीला काँग्रेस आमदार अस्लम शेखही उपस्थित होते. गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, धारावी पुनर्विकासात भूमिपुत्रांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. गावकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला....
समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!
महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले
बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले