महायुतीच्या बॅनरवरून अजितदादांचे ‘विसर्जन

महायुतीच्या बॅनरवरून अजितदादांचे ‘विसर्जन

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार गणेशोत्सवाच्या भेटीला आले नाहीत, म्हणून मिंधे गटाच्या पदाधिकाऱयाने त्यांच्या पह्टोलाच काळे कापड लावून मंडळाच्या मंडपावरील महायुतीच्या बॅनरवरून अजितदादांचे विसर्जन केले. सुरेंद्र जेवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये गणेशोत्सव साजरा केला. महायुतीच्या सत्तेत एकत्र आहेत म्हणून मंडळाच्या मंडपावर अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. अजित पवार दर्शन घ्यायला येतील आणि मंडळाला भेट देतील या आशेवर जेवरे होते. परंतु ते आलेच नाहीत. यामुळे जेवरेंनी नाराज होऊन
अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पह्टोला काळ्या कापडाने झाकले.

अजित पवार गुलाबी कपडे घालून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहेत. योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ असे असले तरी प्रत्यक्षात अजित पवार गटाकडून ‘मुख्यमंत्री’ हे नाव फ्लेक्स आणि फलकावरून काढून टाकले गेलेय. अजित पवार त्यांच्या गटाकडून ही योजना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने खपविली जात आहे. यावरून श्रेयवाद रंगलेला असून मिंधे आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजकीय तणावाच्या वातावरणात बारामतीमध्येच अजित पवार यांच्या फोटोला काळे कापड लावल्याने बारामतीत तणाव वाढलाय. पोलिसांनी धाव घेत जेवरेंना ताब्यात घेतले.

महायुतीमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने पोलीस सतर्प झाले आहेत. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत हा बॅनर खाली घेण्यात आला. या घटनेची चर्चा बारामती आणि संपूर्ण जिह्यात सुरू झाली. त्यानंतर अजित पवार यांनी पुण्यात एका मिंधे गटाच्या पदाधिकाऱयाच्या मंडळाला हजेरी लावली.

सुरेंद्र जेवरे म्हणाले, अजित पवार यांनी अगदी छोटय़ा छोटय़ा तरुण मंडळाच्या गणपतीलादेखील भेट दिली. मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार फिरकले नाहीत. अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही पुटुंबातील पुणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली.

बारामतीत मिंधे गटाने फोटोवर काळा कपडा टाकला

महायुतीच्या सत्तेत एकत्र आहेत म्हणून मंडपावर अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही पह्टो त्यांनी लावले होते. परंतु अजित पवार दर्शन घ्यायला आलेच नाहीत. यामुळे अजित पवार आणि त्यांच्या पुटुंबियांच्या पह्टोला काळ्या कापडाने झाकण्यात आले.

भाजप दादांना मुख्यमंत्री करणार नाही

अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. मात्र भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे, तिथे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक चेहरे आहेत, त्यामुळे ते अजित पवारांना मुख्यमंत्री करतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी का@ंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊतांचा सरकारवर घणाघात एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊतांचा सरकारवर घणाघात
बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे....
पोलीस डायरी – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; वाघाची शेळी झाली!
सुप्रीम कोर्टाने बजावले… मुलींची सुरक्षा ही शाळांचीच जबाबदारी!
मिंध्यांच्या धेंडांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर केले का? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल
लाडकी बहीण हा मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलंच
भाजपच्या ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे रश्मी शुक्ला, शाळेच्या ट्रस्टींच्या बचावासाठी गेम?
चकमक खरी की खोटी… संशयाचं मोहोळ उठलं, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार