एसटीच्या ई-बसमुळे प्रवाशांना बसतोय भुर्दंड, सातारा-पुणे मार्गावरील प्रवाशांमध्ये संताप

एसटीच्या ई-बसमुळे प्रवाशांना बसतोय भुर्दंड, सातारा-पुणे मार्गावरील प्रवाशांमध्ये संताप

सर्काधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा-स्वारगेट (विनाथांबा) मार्गावर नव्याने उपलब्ध झालेल्या ई-बस सोडल्या जात आहेत. या बसने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून 245 रुपये तिकीटदर आकारला जात असून, साध्या बसला 155 रुपये आहे. या मार्गालर सर्वाधिक ई-बस धावत असल्याने प्रवाशांना साध्या बसच्या तुलनेत नाहक 90 रुपयांचा अधिकचा भुर्दंड बसत आहे. नवीन बांधणीच्या साध्या बस उपलब्ध असूनही त्या सातारा-स्वारगेट मार्गावर सोडल्या जात नसल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.

सातारा शहरातून पुण्याला जाण्यासाठी नोकरदारवर्ग, विद्यार्थी व अन्य प्रवाशांची बसस्थानकावर मोठी गर्दी असते. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने सातारा-स्वारगेट या मार्गावर नव्याने बारा मीटरच्या बस दिल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गावर साध्या बस मार्गस्थ केल्या जात होत्या. मात्र, महिनाभरापूर्वी ई-बस उपलब्ध झाल्याने त्या सातारा-स्वारगेट मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे साध्या बसचे प्रमाण कमी आहे. ई-बसचे तिकीट हे साध्या बसपेक्षा 90 रुपये महाग असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर साध्या बस सोडण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. दरम्यान, ई-बसमध्ये अनेक त्रुटी असून, तिकीटदरही अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन साधी बस उपलब्ध करावी, असे सातारा-स्वारगेट प्रवासी संघटना अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.

700 प्रवाशांची नियमित ये-जा

n सातारा-स्वारगेट मार्गावरून एसटी महामंडळाला सर्काधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर दररोज ई-बसच्या तेरा ते चौदा फेऱ्या व साध्या एसटी बसच्या सहा ते सात फेऱ्या होतात. तसेच दररोज सुमारे सातशे प्रवासी सातारा-स्वारगेट मार्गावर प्रवास करतात. तिकीट खिडकीवर कायमच प्रवाशांची भली मोठी रांग लागलेली असते. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत जादा महसूल देणाऱ्या प्रवाशांच्या मागणीचा विचारदेखील करणे आकश्यक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु