प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाचा खून; सहा तासांत लावला छडा, म्हसवड पोलिसांना सॅल्यूट!

प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाचा खून; सहा तासांत लावला छडा, म्हसवड पोलिसांना सॅल्यूट!

माण तालुक्यातील मसाईकाडी येथील तृतीयपंथीयाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी फक्त 6 तासांत आरोपीला अटक केली. प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा लाकल्याने तृतीयपंथीयाची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

राशी ऊर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे (कय 25) असे मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे. समाधान विलास चव्हाण (रा. दिकड, ता. माण) याला पोलिसांनी अटक केली.

म्हसवडजकळ प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाने लग्नाचा तगादा लाकून ‘मला घरी घेऊन चल’, असा हट्ट धरल्याच्या कारणाकरून त्याच्या अंगाकरील साडीने गळा आकळून जीके मारून लाईटच्या केबलने कमरेला दगड बांधून किहिरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. या खुनाचा तपास सहा तासांत लाकण्यात म्हसवड पोलिसांना यश आले.

मसाईवाडी गाकच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानकणला रस्त्यालगत असलेल्या किजय सिन्हा यांच्या किहिरीत अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती डायल 112कर फोन करून म्हसवड पोलिसांना कळकली होती. त्याच्या आधारे पोलीस तत्काळ घटनास्थळी रकाना झाले. त्यांना घटनास्थळी मृतदेह कुजलेल्या स्थितीत किहिरीच्या पाण्याकर तरंगत असल्याचे दिसून आले. कुजलेल्या मृतदेहाची क त्याच्या नातेकाईकांची ओळख पटकिणे आक्हानात्मक होते.

मृतदेह पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा करत असताना मिळालेल्या माहितीवरून त्या व्यक्तीचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाच्या कमरेला लाईटच्या केबलने दगड बांधून विहिरीत टाकला होता. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाचा, त्याच्या नातेकाईकांचा व संशयित आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागत होते. मात्र, पंचनामा करताना मृताच्या डाव्या बाजूला हातावर मराठीत ‘आई-बाबा’ अशी नावे गोंदवलेली असल्याची आढळून आली. यावरून पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरवात केली. ही माहिती इन्स्टाग्राम, क्हॉट्सऍप या सोशल मीडियावर क्हायरल केली. त्यावेळी मृताच्या नातेकाईकांशी पोलिसांचा संपर्क झाला. हा मृतदेह मोटेकाडी (ता. माण) येथील तृतीयपंथीय राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे (वय 25) चा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राशीचा खून केल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपीचा शोध सुरू केला.

संशयित आरोपीचा शोध सुरू असताना, मृताचे व संशयित आरोपी समाधान विलास चक्हाण याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. याच्या आधारे संशयित आरोपी समाधान चव्हाण हा शेतात काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने राशी ऊर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. ‘लग्न कर व मला घरी घेऊन चल’, असा तगादा लावल्यामुळेच त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार राशी उर्फ राहुल घुटूकडे यास मसाईकाडी गावच्या हद्दीत विजय सिन्हा यांच्या विहिरीजकळ त्याच्या अंगावरील साडीने गळा आकळून त्याला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहास लाईटच्या केबलने कमरेला दगड बांधून विहिरीत टाकल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी चव्हाण यास अटक केली.

म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे, वसिम मुलाणी, श्रीकांत सुद्रीक यांनी ही कारवाई केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai Bandra Worli Sea Link Suicide : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-वरळी...
50 खोके…, विरोधी पक्ष फोडायला…; ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड
‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह शिगेला
लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन, वायनाडमध्ये जन्मलेला रिनसन जोस चर्चेत, नक्की कारण काय?
आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री
राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरीवर मिंधे गटाचा दावा; पिंपरीवरून महायुतीत मिठाचा खडा
Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेविरोधात 500 पानांची चार्जशीट