मुद्दा – आई ओवीत असावी की शिवीत?

मुद्दा – आई ओवीत असावी की शिवीत?

>> स्नेहा अजित चव्हाण

प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते ते आईला. प्रेम व त्यागाची मूर्ती म्हणजे आई. ‘आई’ या शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले असते. लहान मुलांच्या मुखातून पहिला शब्द येतो तो आई.

धरणीलासुद्धा धरणी माता असे  आपण संबोधतो.

आपल्या देशाचा उल्लेख करताना आपण  भारतमाता असा करतो. 15 ऑगस्टला ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करतो. नदीलासुद्धा आईची उपमा देतो. जसे गंगा  मैया, संथ वाहते कृष्णामाई. अशा अनेक  रूपांमध्ये आपण आई बघतो. पंढरपुरातील पांडुरंगालासुद्धा आपण ‘माऊली’ अशी हाक मारतो. आईचे गोडवे व आईवरून पोवाडे गातो. आई म्हणजे फक्त दोनच अक्षरांचा शब्द नाही. ‘आई’मधील ‘आ’ म्हणजे आत्मा व ‘ई’ म्हणजे ईश्वर. पण  ‘आई’ या शब्दावरून  सर्रास शिवी देणारे अनेक जण मी अवतीभवती अगदी सहजपणे बोलताना पाहिले आहेत. खरंच, आईवरून शिवी देणारे शूर आहेत का?

आईच्या नावावरून एखादी शिवी देणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का? मारामारी करताना, भांडण झाले की, आईवरून शिवी देणे कितपत योग्य आहे?

खरं तर प्रत्येक स्त्राrचा आई म्हणून आदर करायला हवा. कुठलीच आई आपल्या मुलाला शिवी शिकविणार नाही. रस्त्याने चालताना हे सर्रास होते. मला इथे फक्त एवढेच नमूद करावेसे वाटते की, खरंच गरज आहे तर कानाखाली वाजव, पण आईच्या नावाने  शिवी नको. आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.

मूल लहान असताना ते आई-वडील यांच्या सोबत वाढत असतं.

थोडं मोठं झालं की, पालक आणि शाळा यांच्याशी त्याचा संबंध येतो. शाळा संपली की, पालक आणि कॉलेज.

बरं,  यामध्ये कुठेच घरात किंवा शाळा- कॉलेजमध्ये शिवी शिकवली जात नाही. मग जी अभ्यासक्रमात नाही, संवादात नाही, घरात नाही, पण समाजात वावरताना कानावर ऐकू येते, तर कधी तोंडातून येते. यामध्ये दोष कुणाचा?

पालक वर्ग, शिक्षकवृंद की समाजाचा?

मला इथे नुसती समस्या मांडायची नाही.

कारण समस्या आहे, तर उपायसुद्धा असतो.

ही एक संयुक्त  नैतिक जबाबदारी आहे…

आई-वडील यांच्यामधील पालकत्वाची,

सुजाण नागरिक बनवणाऱ्या शिक्षकवृंदाची,

समाजातल्या प्रत्येक घटकाची.

घर-शाळा-समाज  या त्रिवेणी संगमामध्ये  घडणारी ही पिढी. नक्की कुठे चालली आहे?

यासाठी घरात वावरताना, शाळेत शिकताना, समाजामध्ये घडताना सुसंगतपणा असणे अत्यंत गरजेचे आहे.

[email protected]

(श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या झोपडपट्ट्या
नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप
फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई