अत्याचारी नराधमाला अटक करा; शिवसेनेचा पोलीस ठाण्याला घेराव
नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत 15 सप्टेंबर रोजी आठ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केला. मात्र पोलिसांनी संबंधित नराधमाला अद्याप अटक केली नाही. त्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करून कारवाई करा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी पारडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात येणार आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस प्रशासनाद्वारे आरोपीस अद्यापही अटक केली नसल्यामुळे या घटनेचा जाब विचारण्याकरिता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता पारडी पोलीस स्टेशनला शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात येणार आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत यावेळी जाबही विचारला जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List