फुलं आणायला जातो म्हणून घरातून बाहेर पडले, परत आलेच नाही; प्रसिद्ध शास्त्रज्ञ मुंबईतून अचानक गायब

फुलं आणायला जातो म्हणून घरातून बाहेर पडले, परत आलेच नाही; प्रसिद्ध शास्त्रज्ञ मुंबईतून अचानक गायब

भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) वैज्ञानिक म्हणून काम केलेले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते , ज्येष्ठ शास्त्रज्ञ विनायक कोलवणकर हे राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. ते 76 वर्षांचे असून मुंबईतील वांद्रे येथून राहत्या घरातून बाहेर गेले होते, ते परत आलेच नाहीत. गेल्या गुरूवारपासून ( 5 सप्टेंबर) ते बेपत्ता आहेत.ोलवणकर हे स्मृतीभ्रंशाने आजारी होते, अशी माहिती देखील समोर आली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवणकर हे वांद्रे पूर्व येथील पीएफ कार्यालयाच्या मागे असलेल्या आराधना न्यू एमआयजी कॉलनीत राहतात. ते गेल्या चार वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होते. 5 सप्टेंबर, गुरूवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ते फुले आणायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र आत्तापर्यंत ते घरी परतलेलेच नाहीत. दरम्यान या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोलवणकर हे शेवटचे बांद्रा ईस्टच्या एमआयजी कॉलनीमध्ये टी-शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये दिसले होते.

राष्ट्रपती पुरस्काराने झाले होते सन्मानित

विनायक कोलवणकर हे बीएआरसी मध्ये वैज्ञानिक होते. भूकंपांची पूर्वसूचना देण्यासंदर्भात कोलवणकर यांनी मोलाचं काम केलं होतं. दिवंगत, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदक देऊन कोलवणकर यांचा गौरव केला होता. BARC मध्ये 40 वर्षे काम केले त्यानंतर 2008 मध्ये ते निवृत्त झाले. कोलवणकर यांनी भूकंपशास्त्र, भूकंपाचा अभ्यास या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्याच्या संशोधनाने देशांना भूकंप होण्याआधीच्या स्थानांचा अंदाज लावण्यास मदत केली, ज्यामध्ये सूर्य, चंद्र आणि विशिष्ट ठिकाणांचा समावेश आहे. त्यांचे कार्य जगभरातील 125 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

“माझे वडील एक महान वैज्ञानिक होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले.’ असे त्यांचा मुलगा अमित याने सांगितले. तो सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. ‘ ते गेल्या चार वर्षांपासून अल्झायमरने त्रस्त असून माझी आई वैशाली व बाबा वांद्रे पूर्व येथे राहतात. गुरुवारपासून ते बेपत्ता आहेत. आमच्या घरी केअरटेकर असला तरी ते गुरुवारी एकटेच निघून गेले जून परतलेच नाहीत’ असे अमित याने नमूद केले. ‘ वांद्रे स्टेशन येथील सीसीटीव्हीमध्ये ते शेवटचे दिसले होते, पण नंतर वांद्रे पश्चिम येथे गेल्यावर ते बेपत्ता झाले. चार दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने आम्हाला खूपच काळजी वाटत आहे ‘ असेही तो म्हणाला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवान है’ चा...
ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…
विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले
योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले
Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज
Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी