Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बावनकुळेंच्या गाडीची धडक, नंबर प्लेट गायब, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बावनकुळेंच्या गाडीची धडक, नंबर प्लेट गायब, पाहा Video

नागपुरात ऑडी कारच्या चालकानं एक कार आणि एका दुचाकीला जबर धडक दिल्याचं समोर आलंय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी यावर ऑडी कारचा मध्यधुंद अवस्थेत असलेला चालक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पुत्र संकेत बावनकुळेकडे बोट दाखवलंय. पोलिसांच्या माहितीनुसार दुचाकी आणि कारला धडक देणारी ऑडी कार बावनकुळेंच्या मालकीची आहे. मात्र अपघातावेळी कारमध्ये बावनकुळेंचा चालक अर्जुन हावरे आणि त्यांचा मित्र रोनित चिंतमवार असल्याचं पोलीस सांगतायत. चालक दारु प्यायल्याचा पोलिसांना प्रथमदर्शनी संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी चालकासह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केलाय.

रात्री साडे १२ वाजता हा अपघात घडला माहितीनुसार काचीपुरापासून ते लोकमत चौका दरम्यान ही दुर्घटना घडली. आरोपानुसार ऑडी कारचा वेग ताशी १५० किमी होता. आधी कारनं एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका कारला आणि परत एका तिसऱ्या कारला याच ऑडी कारनं धडक दिली. काही मीटर अंतरावर एकच कार 3 वाहनांना धडक देते, यावरुन कारचालकानं प्रमाणाबाहेर मद्य प्राशन केल्याचं बोललं जातंय. दरम्यान गाडीत नेमकं कोण-कोण होतं. अपघात स्थळावरचं सीसीटीव्ही कुठे आहे? याची उत्तरं अद्याप मिळालेले नाहीत. अपघाताची प्रथमदर्शनी माहिती दिल्यास संध्याकाळपर्यंत तरी पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला. काल रात्री अपघात घडूनही आज दुपारपर्यंत तरी गृहखात्याच्या ऑनलाईन पोर्टलवर एफआयआर अपलोड झालेली नाही.

महाराष्ट्राच्या उपराजधानीत हा प्रकार घडत असतानाच सांस्कृतिक राजधानी पुण्यातही पुन्हा ड्रँक अँड ड्राईव्हनं एका महिलेचा जीव घेतलाय. नागपुरात ऑडी कारनं आधी एक मोटरसायकल, नंतर दोन वाहनांना लागोपाठ धडक दिली. पुण्यात दारु प्यायलेला एका पिकअप चालकानं एक चार चाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक मारली.

पौड रस्त्यावरच्या दुर्घटनेवेळी मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळेंच्या पत्नी गीतांजली अमराळे रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्याचवेळी सुसाट वेगानं आलेल्या पिकअप चालकानं त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात गीतांजली अमराळे यांच्या मृत्यू झाला.तर पती श्रीकांत अमराळे गंभीर जखमी आहेत. इतर पाच ते सहा जणांना धडक दिलेले देखील जखमी झाले आहेत.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान दारु पिवून बेदरकार वाहनांखाली सामान्यांच्या जीव जात असल्याच्या घटना सातत्यानं वाढतायत. याआधी नागपुरात दोन बड्या प्रस्थ असलेल्या महिलांनी दारुच्या नशेत एका दुचाकीला धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासावर प्रश्न उभे राहिले. पुण्यात बिल्डरपुत्र अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत एक तरुण आणि तरुणीला चिरडलं. आधीच्या एफआयआरमध्ये कमकुवत कलम लावलं गेलं. टीका झाल्यानंतर त्यात दुरुस्ती करुन पोलिसांचं निलंबित झालं. नंतर आरोपीच्या रक्तात दारु सापडू नये म्हणून त्याचे रक्ताच्या नमुन्यातही फेरफार केलं गेल्याचं समोर आलं.

मुंबईत शिंदे गटाचे माजी नेते राजेश शाहाचा मुलगा मिहिर शाहानं पहाटे दारुच्या नशेत मासे नेणाऱ्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. महिलेची साडी कारच्या चाकात अडकूनही आरोपीनं अनेक मीटर पर्यंत फरफटत नेल्यानं महिलेचा मृत्यू झाला. आरोपी फरार झाल्यानं टीका सुरु झाली. नंतर काही दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली. जळगाव, संभाजीनगरसह अनेक भागात घडलेल्या अशाच घटनांवरुन वारंवार पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्न उभे राहत आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल? तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल?
बदलापूरमधील नामांकित शाळेमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याचा सेल्फ...
Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटरचा झाला की केला? मोठी अपडेट समोर
‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा
Akshay Shinde Encounter आज जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद – आदित्य ठाकरे
बिग बॉस मराठी 70 दिवसात संपणार, या दिवशी होणार ग्रँड फिनाले
Badlapur Sexual Assault अक्षय शिंदेबाबत गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे – शरद पवार
Akshay shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…