राहुल गांधींच्या भारतीयत्वाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात, उत्तर देण्यासाठी न्यायालयाने दिला 10 दिवसांचा वेळ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदुस्थानी नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहेत की, नाही यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 10 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल. राहुल गांधींवर दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप आहे आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या मुद्द्यावर भाजप कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांनी याचिका दाखल केली होती. ज्यावर आज सुनावणी पार पडली.
दरम्यान, याप्रकरणी केंद्र सरकारने आज न्यायालयात एक स्टेटस रिपोर्ट दाखल केली होती. परंतु न्यायालयाने हे पुरेसं नसल्याचं मानलं. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, राहुल गांधी यांचे नागरिकत्व संशयास्पद आहे. या आधारावर त्यांच्या लोकसभा सदस्यत्वालाही आव्हान देण्यात आले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत, उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला 10 दिवसांच्या आत तथ्यांसह उत्तर देण्यास सांगितले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List