या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात अक्षरश: वेडा होता व्यावसायिक; तिच्याशी लग्न करण्यासाठी 10 मिनिटांतच विकत घेतला बिग बींच्या घरासमोरील बंगला
सामान्यांपासून ते बॉलिवूडमधील कलाकारांपर्यंत सर्वंजणच प्रेमासाठी काहीही करायाला तयार असतात. अशी कित्येक उदाहरणे आपण पाहू शकतो. पण याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूडची एक अभिनेत्री. या बॉलिवूडच्या अभिनेत्रीच्या प्रेमात एक व्यावसायिक इतका वेडा झाला होता की तिच्याशी लग्न करण्यासाठी काहीह करायला तयार होता. तिने लग्नाला हो म्हणावं म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरील कोटींचा बंगला अवघ्या 10 मिनीटांत विकत घेतला होता. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि त्या बॉलिवूड अभिनेत्रीने लग्नाला हो म्हटलं.
अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता हा व्यावसायिक
ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी आणि तिच्या प्रेमात वेडा झालेला व्यावसायिक म्हणजे अर्थातच तिचा पती राज कुंद्रा. त्यांची प्रेमकहाणी इतकी सोपी नव्हती. शिल्पाने हा लग्नाचा प्रस्ताव आधी नाकारला होता. पण त्या राजला शिल्पाशीच लग्न करायचे होते. मग या अभिनेत्रीला पटवून देण्यासाठी, त्या व्यावसायिकाला अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर एक बंगला खरेदी करावा लागला.
अभिनेत्रीसाठी बिग बींच्या घरासमोरील बंगला खरेदी केला
एका मुलाखतीत राज कुंद्रा म्हणाले की,”मी माझ्या सर्व शक्तीनिशी तिच्या मागे लागलो होते. मला तिच्या हृदयात माझ्यासाठी थोडी जागा आहे असा इशारा मिळाला म्हणून मी म्हणालो चला प्रयत्न करूया” पण शिल्पाची एक अट होती की काहीही झालं तरी ती मुंबई सोडणार नाही. आणि तेव्हा राज लंडनमध्ये राहत होता.त्यानंतर राजने जे पाऊल उचललं ते पाहून शिल्पालाही आश्चर्य वाटलं होतं.
10 मिनीटांत खरेदी केला कोटींचा बंगला
शिल्पाची अट ऐकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजने निर्माते वासू भगनानी यांना फोन केला आणि मुंबईत बंगला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. वासू भगनानी म्हणाले की जुहूमध्ये एक मालमत्ता आहे, जर ती खरेदी करायची असेल तर ती एकदा पाहू शकता. राज कुंद्राने हे घर न पाहताच विकत घेतले तेही अगदी 10 मिनिटांच्या चर्चेवरून. हा बंगला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरच आहे. त्यानंतर राजने लगेच शिल्पाला फोन करून त्याबद्दल सांगितले. तो शिल्पाला म्हणाला ” तू म्हणत होतीसना की मी मुंबई सोडून जाऊ शकत नाही, आता मी मुंबईत घर घेतले आहे.” राजने जे केलं ते पाहून शिल्पालाही आश्चर्य वाटलं. अखेर त्याची कल्पना यशस्वी झाली आणि शिल्पा शेट्टीने लग्नासाठी हो म्हटलं.
लग्नात अभिनेत्रीला 3 कोटींची अंगठी अन्…
शिल्पा आणि राजने 22 नोव्हेंबर 2009 मध्ये रोजी राज कुंद्रासोबत लग्न केलं. त्यांचे लग्न खंडाळा येथील शिल्पा शेट्टीच्या जवळच्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर झाले. लग्नात राजने शिल्पाला 3 कोटींची अंगठी भेट दिली होती. शिल्पाने तिच्या लग्नात 50 लाखांची साडी नेसली होती. शिल्पाच्या लाल साडीवर स्वारोवस्की क्रिस्टल्स होते, शिल्पाची ही डिझायनर साडी तरुण ताहिलियानीने डिझाइन केली होती. एवढंच नाही तर राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीला जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा येथे एक अपार्टमेंटही भेट दिलं आहे. त्यांचे अपार्टमेंट 19 व्या मजल्यावर असून त्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List