कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक, मुलीलाही घेतले ताब्यात
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची रविवारी त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. बंगळुरूतील के एचएसआर लेआउट येथील राहत्या घरात ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान ओम प्रकाश यांच्या पत्नीने आपणच त्यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. हत्येनंतर प्रकाश यांची पत्नी पल्लवी व मुलगी क्रिती यांनी स्वत:ला एका खोलीत बंद केले होते. पोलिसांनी दार तोडून दोघींना ताब्यात घेतले आहे.
ओमप्रकाश हे दुपारी जेवायला बसले होते. त्यावेळी त्यांचा पत्नी पल्लवीसोबत वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने चाकूने व काचेच्या बाटलीने त्यांच्यावर वार केले. ओमप्रकाश यांच्या छातीवर, पोटावर व हातावर सात ते आठ वेळा वार करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरून दोन चाकू सापडले आहेत. त्यामुळे पल्लवीसोबत त्यांची मुलगी क्रितीने देखील ओमप्रकाश यांच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पल्लवीने पोलीस चौकशीत ओमप्रकाश यांच्यावर आरोप केले आहेत. ”ओमप्रकाश हे कायम घरात बंदूक घेऊन फिरायचे. छोट्या छोट्या भांडणात पण ते मला गोळ्या घालून मारून टाकायची धमकी द्यायचे. त्या दिवशीही आमच्या भांडणानंतर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांना मारले”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List