निवडणूक न होताच दिल्लीत बसणार भाजपचा महापौर, आपने केला गंभीर आरोप
दिल्लीची महापौर निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचा विजय झाला आहे. कारण या निवडणूकीत आम आदमी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. पण आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपने यापूर्वीही दिल्ली महानगरपालिका निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वॉर्डांची पुर्नरचना इकडे तिकडे केल्या, तसेच यात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही भारद्वाज यांनी केला.
आता भाजपकडे नायब राज्यपाल आहे, त्यांच्याकडे दिल्ली महानगरपालिका आहे इतकंच नाही तर भाजपकडे आता दिल्ली विधानसभेची सत्ताही आहे असेही भारद्वाज म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List