दहिसर, बोरिवलीत शिवसेनेचा उद्यापालिकेवर हंडा मोर्चा; पाणीटंचाई, गढूळ पाण्याविरोधात विचारणार जाब
विभागातील पाणीटंचाई तसेच गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या गढूळ पाणी, रस्त्यांची निकृष्ट कामे, प्रस्तावित कचरा कर यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने दहिसरमध्ये मंगळवार, 22 एप्रिलला तर बुधवार, 23 एप्रिलला बोरिवलीत दुपारी 3 वाजता हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने महापालिका आर-उत्तर व आर मध्य कार्यालयांवर पाण्यासह इतर प्रश्नांसाठी हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. आर-उत्तर महापालिका कार्यालयावरील मोर्चा मंगळवार, 22 एप्रिलला दुपारी 3 वाजता दीपा हॉटेल, जैन मंदिर, दहिसर स्थानकावरून दहिसर महापालिका कार्यालयावर काढण्यात येणार आहे. आर-मध्य महापालिका कार्यालयावर बुधवार, 23 एप्रिलला दुपारी 3 वाजता गोयल शॉपिंग सेंटर, एस. व्ही. रोड, बोरिवली स्थानक येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. या दोन्ही मोर्चात शाखा क्र. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या शाखांचे शिवसैनिक, पदाधिकारी आणि विभागातील रहिवासी सहभागी होणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List