मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यूप्रकरण: डॉ. घैसास यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ससून रुग्णालयाच्या फेर चौकशी अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर एकूण तीन अहवाल आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यासाठी डिपॉझिट न दिल्याने तिच्यावर वेळेत उपचार न मिळून तिचा मृत्यू झाला होता. गर्भवती रुग्ण तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांकडे २० लाखाचे डिपॉझिट मागण्यात आले होते. ते पैसे न भरल्याने या महिलेला दोन ते पाच तास तिष्ठत ठेवण्यात आले होते. त्यामुळे अखेर अन्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात वेळ गेल्याने जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्रावाने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.
रुग्णाला पाच तास तिष्ठत ठेवले
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ.घैसास यांनी रुग्णाला डिपॉझिट न भरल्याने उपचार सुरु केले नाहीत. त्याला तिष्ठत ठेवल्याने त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे हा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या समितीच्या पहिल्याच अहवालात ठेवला होता.डॉ. सुश्रुत घैसास आणि त्यांच्या पथकाने पाच तास रुग्णाला एडमिट केले नाही. पेशंटची सर्व हिस्ट्री माहीती असूनही तातडीचे कोणतेही उपचार सुरु केले नाहीत. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर टाच आणावी, अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List