उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा कम्प्लसरी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रान पेटले आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे. तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का ? असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची रि ओढली आहे. त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपल मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्या सोबत यायला तयार आहोत. परंतू उद्धव ठाकरे यांनी देखील एक अट पाळावी अशी मागणी राज यांनी केली आहे. या मुद्यांवर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले की…
राज ठाकरे यांनी टाळी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की दोघेही जण हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्याच्यांत. दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही. त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लगीन घाई लागलेली असते. राज ठाकरे यांच्या घरात चहा, नाश्ता पण चांगला मिळतो.त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो.आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत. राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत हा विषय आहे असेही सामंत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं. या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांना सांगितले आहे असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले
भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रीया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपला मध्ये येण्याचं काही कारण नाही. लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती. तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता. विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज ठाकरे यांनी साथ दिली. आता राज ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे.. त्यांनी भूमिका घ्यायची आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
आता पुलाखालून बरेच पाणी गेलेय…
उद्धव ठाकरे हे महायुती म्हणून बाहेर गेले होते.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं.ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं..महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती असेही चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेच जे सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होते. नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होत..आता तसेच सरकार आले आहे.तेव्हाही आपलं बहुमत होतं. भाजप आणि सेनेने एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं. ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असेही चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
–
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List